Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Milk Price hike: मुंबईकरांना महागाईचा आणखी एक धक्का; सुटे दूध 7 रुपयांनी महागणार

महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता मुंबईकरांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे सुट्या दुधाच्या दरात वाढ (Milk Price hike) होणार आहे. सुट्या दुधाचे दर प्रति लिटर सात रुपयांनी वाढवण्यात येणार आहेत.

Mumbai Milk Price hike: मुंबईकरांना महागाईचा आणखी एक धक्का; सुटे दूध 7 रुपयांनी महागणार
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 1:35 PM

मुंबई :  सध्या देशात महागाई (inflation) सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि खाद्यतेलापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता मुंबईकरांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे सुट्या दुधाच्या दरात वाढ (Milk Price hike) होणार आहे. सुट्या दुधाचे दर प्रति लिटर सात रुपयांनी वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता एक लिटर सुट्या दूधासाठी मुंबईकरांना 80 रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. यापूर्वी अमूल (Amul) आणि मदर डेरीकडून देखील दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. अमूल आणि मदर डेरीने दूधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यानंतर आता सुट्या दूधाच्या दरात देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दूधाचे दर का वाढले?

वाढत्या महागाईमुळे पशुपालन करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. जनावारांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी बंदिस्त पशुपालन केले जाते. तिथे जनावरांना अधिक चाऱ्याची गरज असते. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी यासारख्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत.  इंधनामध्ये झालेल्या मोठ्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च देखील वाढला आहे. सर्वच क्षेत्रात महागाई वाढत असल्याने अखेर दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुट्या दुधाच्या दरात प्रति लिटरमागे सात रुपयांची वाढ करण्यात आली असून, नवे दर एक सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आता एक लिटर दूधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत.

देशात महागाईचा भडका

देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेलपासून ते अन्नधान्यापर्यंत आणि खाद्यतेलापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवणे हे सरकार आणि भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयसमोर मोठे आव्हान आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी  चालू वर्षात तीनदा आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.