Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPO News : या 7 कंपन्यांचे आयपीओ बाजारात, गुंतवणुकीची मोठी संधी

IPO News : आयपीओ बाजारात तेजीचे वातावरण आहे. पुढील आठवड्यात एक नव्हे दोन नव्हे तर 7 कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. यापैकी 3 कंपन्या IPO च्या मुख्य रस्त्याने जातील, तर 4 कंपन्या एसएमई(SME) पद्धतीने सूचीबद्ध होतील.

IPO News : या 7 कंपन्यांचे आयपीओ बाजारात, गुंतवणुकीची मोठी संधी
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 4:49 PM

नवी दिल्ली : आयपीओ बाजारात तेजीचे वातावरण आहे. पुढील आठवड्यात एक नव्हे दोन नव्हे तर 7 कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. यापैकी 3 कंपन्या IPO च्या मुख्य रस्त्याने जातील, तर 4 कंपन्या एसएमई(SME) पद्धतीने सूचीबद्ध होतील. सोमवारपासून 26 जुलै पासून या कंपन्यामध्ये गुंतवणूकदारांना नशीब आजमावता येईल. या 7 कंपन्याय आयपीओ बाजारातून (IPO Market) जवळपास 1600 कोटी रुपये जमा करणार आहेत. एसएमई इश्यूतून 110 कोटी रुपये जमा करण्याची शक्यता आहे. यामध्ये ड्रोन कंपनीपासून ते आयटी फर्मपर्यंत अनेक कंपन्यांचा समावेश आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या सहायाने गुंतवणूक केल्यास लॉटरी लागू शकते.

Idea Forge IPO

  • पुढील आठवड्यात पहिला आयपीओ हा ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीचा आहे
  • आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी (Idea Forge Technology) घेऊन येत आहे
  • 26 जून रोजी हा आयपीओ उघडेल. 638-672 रुपये प्रति शेअर प्राईंस बँड असेल
  • ही कंपनी बाजारातून जवळपास 567 कोटी रुपये जमा करणार
  • एंकर गुंतवणूकदारांकडून 254.88 कोटी रुपये जमाविण्यात आले आहेत
  • आयपीओ 29 जून रोजी बंद होणार आहे. 7 जुलै रोजी शेअर सूचीबद्ध होईल

Cyient DLM IPO

हे सुद्धा वाचा
  • 27 जून रोजी उघडेल. 30 जून पर्यंत गुंतवणुकीची संधी
  • प्राईस बँड 250-265 रुपये प्रति शेअर असेल
  • कंपनी जवळपास 592 कोटी रुपये जमा करणार

PKH Ventures IPO

  • बांधकाम आणि विकास क्षेत्रातील पीकेएच व्हेंचर्स कंपनीचा आयपीओ
  • आयपीओसाठी 30 जून रोजी बोली, 4 जुलै रोजीपर्यंत गुंतवणूक करता येईल
  • ही कंपनी 380 कोटी रुपये जमा करणार
  • प्राईस बँड जाहीर केलेला नाही. कंपनीचे 100 टक्के मालकी प्रमोटर्सकडे

Pentagon Rubber IPO

  • पेंटागन रबर पुढील आठवड्यात एसएमई सेगमेंटमध्ये आयपीओ आणणार
  • 26 जून रोजी बोली लावता येईल. 30 जून रोजी आयपीओ बंद होईल
  • ही कंपनी 16.17 कोटी जमाविणार, प्राईस बँड 65-70 रुपये प्रति शेअर आहे

Global Pet IPO

  • SME सेक्टरमधील दुसरा आयपीओ ग्लोबल पेट इंडस्ट्रीजचा आहे
  • आयपीओसाठी 29 जून रोजी बोली लागेल. 3 जुलैपर्यंत गुंतवणुकीचा पर्याय
  • आयपीओ एकूण 13.23 कोटी रुपये जमविणार, प्रति शेअर 49 रुपये भाव निश्चित

Tridhya Tech IPO

  • सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी त्रिध्या टेकचा आयपीओ पुढील हप्त्यात येणार
  • या आयपीओसाठी 35-42 रुपये प्रति शेअरचा प्राईस बँड
  • 26.41 कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट

Synoptics Technologies IPO

  • आयटी सर्व्हिस कंपनी सिनोप्टिक्स टेक्नॉलॉजीजचा आयपीओ पुढील आठवड्यात
  • कंपनीने आपल्या शेअरसाठी 237 रुपये प्रति शेअर भाव निश्चित
  • आयपीओमध्ये 35.08 कोटी रुपये नवीन शेअरसाठी
  • तर प्रमोटर्सकडून 18.96 कोटी रुपयांचा ओएफएस

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.