Mukesh Ambani : साबण इंडस्ट्रीत रिलायन्स घालणार धुमाकूळ! मुकेश अंबानी यांचा मेगा प्लॅन काय

Mukesh Ambani : भारताची साबण इंडस्ट्रीज फार मोठी आहे. एफएमसीजी अंतर्गत हा मोठा सेगमेंट आहे. आता यामध्ये रिलायन्स मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ग्राहकांचा फायदा तर होईलच. पण प्रतिस्पर्धी कंपन्यांना तगडे आव्हान मिळेल.

Mukesh Ambani : साबण इंडस्ट्रीत रिलायन्स घालणार धुमाकूळ! मुकेश अंबानी यांचा मेगा प्लॅन काय
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 8:33 PM

नवी दिल्ली : भारतातील जवळपास प्रत्येक घरात लक्स, डव, लाईफबॉय, पीयर्स अथवा इतर कोणता तरी कंपनीचा साबण (Branded Soap) वापरल्या जातोच. जाहिरातीत दाखविल्या जाणाऱ्या एखाद्या साबणापैकी एक तरी घरात येतोच. गरीबातील गरीब अथवा श्रीमंतातील श्रीमंत व्यक्ती अंघोळीला कोणत्या ना कोणत्या ब्रँडचा साबण वापरतोच. आता हा सेगमेंट फार मोठा आहे. यातील उलाढाल ही फार मोठी आहे. महागाईच्या झळा बसत असतानाही कंपन्या भावाचा ताळमेळ बसवत आहे. त्यांना ग्राहक तुटू द्यायचा नाही आणि नफा पण कमवायचा आहे. पण आता त्यांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. या सेगमेंटमध्ये नवीन दमदार खेळाडू एंट्री घेत आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा रिलायन्स समूह (Reliance Group) साबण सेगमेंटमध्ये उडी घेत आहे.

रिटेल सेक्टरमध्ये रिलायन्स सध्या सर्वात मोठी कंपनी आहे. देशातील एफएमसीजी सेक्टर जवळपास 5 लाख कोटी रुपयांचा आहे. हे मार्केटमध्ये मोठा वाटेकरी होण्यासाठी रिलायन्स नवी खेळी खेळत आहे. कंपनीने नुकतीच पीठ, तेल, तांदुळ इत्यादी क्षेत्रात Independent ब्रँड नावाने एंट्री मारली. आता त्यांचे लक्ष्य ब्युटी आणि पर्सनल केअर सेगमेंटवर आहे. या सेगमेंटमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी, दादा आहे. तिला रिलायन्स टक्कर देणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजची रिलायन्स कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेडने (RCPL) एफएमसीजी सेक्टर संबंधित अनेक जुन्या आणि लोकप्रिय ब्रँडचे अधिग्रहण केले आहे. तसेच त्यांचा नवीन ब्रँडही लाँच केला आहे. ब्युटी आणि पर्सनल केअर सेगमेंटमधील साबण श्रेणीत त्यांनी Glimmer हा साबण बाजारात आणला आहे. तर Get Real नावाने हर्बल नॅचरल सेगमेंट उत्पादनात उडी घेतली आहे. तर Puric नावाने एंटी-सेप्टिक मार्केटमध्ये प्रवेश केला आहे.

हे सुद्धा वाचा

किचनमध्ये एंट्री

हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या डिशवॉशर विमला रिलायन्सने टक्कर दिली आहे. त्यासाठी Dozo हा ब्रँड आणला आहे. टॉयलेट आणि फ्लोअर क्लिनर सेगमेंटमध्ये Harpic ला त्यांचा HomeGuard हा ब्रँड टक्कर देत आहे. तर लॉंड्री सेगमेंटमध्ये Enzo डिटर्जेंट, लिक्विड आणि साबण हा ब्रँड बाजारात आणला आहे. पण आता रिलायन्स एफसीजी मार्केटसाठी एक मोठी कंपनी तयार करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी पाऊलं टाकले आहे.

रिलायन्सचे देशात 16,600 पेक्षा अधिक स्टोअर आहेत. त्याआधारे रिलायन्स किरकोळ विक्रीत अग्रेसर कंपनी आहे. त्यांच्याकडे देशभरात सध्या 30 लाखांहून अधिक किराणा पार्टनर्स आहेत. ते जिओ मार्ट प्लेटफॉर्म सोबत जोडल्या गेले आहेत. आता रिलायन्सच्या या नवीन बिग प्लॅनमुळे जुन्या खेळाडूंना त्यांची रणनीती बदलावी लागणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.