today Petrol diesel rates : सलग 36 व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

राज्यात आज पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जाणून घेऊयात प्रमुख शहरातील इंधनाचे दर

today Petrol diesel rates : सलग 36 व्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोल डिझेलचे दर Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 6:48 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol diesel rates) जारी करण्यात आले आहेत. इंधनाच्या नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. आज सलग 36 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कच्च्या तेलाच्या दरात चढ -उतार सुरू आहे, मात्र देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मार्चपासून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाली होती. सहा एप्रिलपर्यंत भाव वाढले. या काळात पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटर दहा रुपयांपेक्षा अधिक वाढले. मात्र त्यानंतर पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये लिटर आहे. काही राज्यांनी मध्यंतरी व्हॅटमध्ये कपात केल्याने त्या राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्यादरानुसार आज राज्यात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल हे परभणीमध्ये आहे. परभणीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.51 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 106 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 121.30 रुपये आहे. तर डिझेलचा भाव प्रति लिटर 104. 50 रुपये आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.20 रुपये असून, डिझेलचा दर 104. 50 रुपये प्रति लिटर इतका आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.40 आहे तर डिझेलचा दर 103.73 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये लिटर आहे.

राज्यात व्हॅटमध्ये कपात कधी

चार नोव्हेंबर 2021 रोजी केंद्राने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल प्रति लिटर पाच रुपये तर डिझेल प्रति लिटर दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर अनेक राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्यात आली. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पहाता राज्यांनी इंधनाच्या व्हॅटमध्ये कपात करावी असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे. मात्र अद्यापही राज्यात पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात न करण्यात आल्याने राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.