Gaganyaan Mission | गगनयान मोहिमेतील शास्त्रज्ञांचा मेहनताना तरी किती, इतके मिळते वेतन

Gaganyaan Mission | गगनयान मिशनची पहिल्यांदा 2018 साली घोषणा करण्यात आली. पण कोरोनामुळे हे मिशन लांबले. या प्रकल्पावर अनेक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी जीवतोड मेहनत घेतली आहे. या मोहिमेत एस. सोमनाथ, एस. उन्नीकृष्णन नायर आणि व्ही.आर ललिथाबिका हे प्रमुख आहेत. इतर ही मोठी स्टारकास्ट आहे.

Gaganyaan Mission | गगनयान मोहिमेतील शास्त्रज्ञांचा मेहनताना तरी किती, इतके मिळते वेतन
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 2:22 PM

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. इस्त्रो मानवासहित अंतराळात झेपावणार आहे. चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरविण्याच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. आज झालेल्या पहिल्या चाचणीत इस्त्रोने यश मिळवले. मानवाला अंतराळात पाठविण्याचा विडा इस्त्रोने उचलला आहे. सध्याची चाचणी ही मानवरहीत आहे. 2018 मध्ये पहिल्यांदा गगनयान मिशनवर काम सुरु झाले. पण कोरोना आणि इतर संकटांमुळे हे मिशन पुढे ढकलण्यात आले. या प्रकल्पासाठी अनेक शास्त्रज्ञांसह तंत्रज्ञांनी मोठी मेहनत घेतली. एस. सोमनाथ, एस. उन्नीकृष्णन नायर आणि व्ही.आर ललिथाबिका हे या मोहिमेचे प्रमुख आहेत.

आला अडथळा पण इतिहास रचला

अंतराळात मानवीय मोहिम काढण्यासाठी चाचणी करण्यात येत आहे. आज पहिल्या चाचणीत तांत्रिक अडथळा आला. ही मोहिम रद्द झाल्याचे कळविण्यात आले. अडथळे दूर करण्यात आले. तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या. दोन तासांनी ही मोहिम राबविण्यात आली आणि ती यशस्वी झाली. या मोहिमेतील शास्त्रज्ञांनी घेतलेल्या या अथक प्रयत्नांमुळे अडथळा आला तरी इस्त्रोने इतिहास रचला.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत मिशनमध्ये

एस. सोमनाथ हे इस्त्रोचे चेअरमन आहेत. उन्नीकृष्णन नायर हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे प्रमुख तर व्ही. आर. लथिकाबिका या वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्यासोबत सर्वच अंतराळ मोहिमांमध्ये मोठी स्टारकास्ट आहे. या शास्त्रज्ञांच्या मेहनतीच्या जोरावर इस्त्रोने गेल्या काही महिन्यात मोठा टप्पा गाठला आहे. गेल्यावर्षी चंद्रयान-2 च्या अपयशानंतर इस्त्रोने अनेक विक्रम नावावर कोरले आहेत. त्याची जगाने दखल घेतली आहे.

किती आहे पगार एका रिपोर्टनुसार, इस्त्रोच्या अभियंत्यांना 37,400 ते 67,000 रुपये वेतन मिळते. वरिष्ठ शास्त्रज्ञांना 75,000 ते 80,000 रुपये वेतन मिळते. तर या मोहिमेसाठी नियुक्त प्रमुख शास्त्रज्ञांना 2 लाख रुपयांचे वेतन देण्यात येते. तर या मोहिमेतील उत्कृष्ट शास्त्रज्ञांना 1,82,000 रुपये आणि अभियंत्यांना 1,44,000 रुपये तर वैज्ञानिक/अभियंता (SG) यांना 1,31,000 आणि वैज्ञानिक/अभियंता (SF) यांना 1,18,000 रुपये पगार मिळतो. तंत्रज्ञांना 21700 – 69100 रुपये, तंत्रज्ञ सहाय्यकांना 44900-142400 रुपये, शास्रज्ञ सहाय्यकाला 44900-142400 रुपये तर लायब्ररी सहाय्यकाला 44900-142400 रुपये आणि इतर पदावरील तंत्रज्ञांना श्रेणीनुसार वेतन देण्यात येते.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.