गणेश चतुर्थीला करोडपती होण्याचा करा श्रीगणेशा; बाप्पाच्या आगमनाला करा अगोदर हे काम

बाजारातील चढउताराचा फटका शेअर बाजारावर पण दिसतो. त्याचा म्युच्युअल फंडच्या रिर्टनवर प्रभाव दिसतो. या गणपती उत्सावाला गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा फॉर्म्युला तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतो. तुम्हाला काही वर्षातच मोठा फायदा होऊ शकतो.

गणेश चतुर्थीला करोडपती होण्याचा करा श्रीगणेशा; बाप्पाच्या आगमनाला करा अगोदर हे काम
असे व्हा करोडपती
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 2:44 PM

एक चांगला म्युच्युअल फंड तुम्हाला सेवानिवृत्ती वेळी मालामाल करू शकतो. श्रीमंतीचे स्वप्न कुणाला पडत नाही? पण योग्य ठिकाणी गुंतवणूक न केल्याचा फटका त्यांना बसतो. या गणेश चुतर्थीला तुम्ही गुंतवणुकीचा श्रीगणेशा करू इच्छित असाल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कोट्याधीश होण्यासाठी 15x15x15 हा नियम पाळा. हा नियम सोपा आणि अचूक ठरला आहे. त्यानुसार 15 वर्षांसाठी गुंतवणूक, 15 हजार रुपयांची एसआयपी आणि 15 टक्क्यांचा परतावा गृहीत धरला आहे. चांगल्या परताव्यासाठी तुम्हाला योग्य फंड निवड करावी लागणार आहे.

15 हजारांची SIP

प्रत्येक महिन्याला तुम्हाला 15 हजारांची सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅननुसार गुंतवणूक करावी लागेल. त्यानुसार 12 महिन्यात तुम्ही 1.8 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. जर त्यावर तुम्हाला वार्षिक 15% रिटर्न मिळाला तर 15 वर्षानंतर तुमच्या 27 लाख रुपयांचे 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक होतील. कोणत्याही गुंतवणुकीसाठी 15 वर्ष हा एक आदर्श वेळ मानल्या जातो. या काळात तुम्हाला गुंतवणुकीसह जमा रक्कमेवर चक्रवाढ व्याज मिळते. अर्थात हा केवळ अंदाज आहे. त्यात परतावा कमी-जास्त होऊ शकतो. तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंड आधारे परतावा मिळतो.

हे सुद्धा वाचा

या गोष्टीचा परताव्यावर होतो परिणाम

बाजारातील चढउताराचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येतो. त्याचा परिणाम म्युच्युअल फंडच्या रिटर्नवर दिसतो. म्युच्युअल फंडाच्या परताव्यावर परिणाम दिसतो. वेगवेगळे म्युच्युअल फंड विविध ठिकाणी त्यांची गुंतवणूक करतात. त्याची जोखीम पण निरनिराळी असते. तुम्ही जितक्या दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक कराल, तितका चांगला परतावा मिळेल.

भविष्यातील गरजेनुसार करा गुंतवणूक

तुमचे उद्दिष्ट, लक्ष्य यानुसार तुमचा गुंतवणुकीचा कालावधी आणि त्याची मर्यादा ठरवा. त्यानुसार गुंतवणूक करा. जर तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट दीर्घकाळाच्या गुंतवणुकीसाठी असेलतर त्यानुसार म्युच्युअल फंडाची निवड करा आण गुंतवणूक करा. जर तुम्ही निवृत्ती काळासाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला आता मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा वाटा गुंतवणूक करा. दीर्घकाळानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. पण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक जोखिमयुक्त असल्याने गुंतवणूक करताना योग्य फंडाची निवड महत्वाची ठरते. काही जण बाँडमध्ये पण गुंतवणूक करतात आणि एक निश्चित परताव्याचा फायदा घेतात.

(विशेष सूचना : टीव्ही 9 मराी कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला देत नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या.)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.