Gas Cylinder : ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस दरवाढीचा; बजेटनंतर महागले गॅस सिलेंडर; आता किती मोजावे लागणार जादा पैसे

Gas cylinders Rate Hike : ऑगस्टचा पहिला दिवस दरवाढीचा ठरला. बजेट 2024 नंतर गॅस सिलेंडरचा भाव वधारला. लोकसभा निवडणुकीनंतर आणि मोदी ३.० सरकारच्या पहिल्या बजेटनंतर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

Gas Cylinder : ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस दरवाढीचा; बजेटनंतर महागले गॅस सिलेंडर; आता किती मोजावे लागणार जादा पैसे
गॅस सिलेंडर महाग
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 8:58 AM

ऑगस्टचा पहिला दिवस दरवाढीचा ठरला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आणि मोदी ३.० सरकारच्या पहिल्या बजेटनंतर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सर्वात अखेरीस गॅस सिलेंडरच्या किंमतीत ९ मार्च २०२४ रोजी कपात दिसली. सरकारने होळीच्या वेळी नागरिकांना दिलासा दिला. १०० रुपयांची कपात केली होती. तर त्यापूर्वी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात २०० रुपयांनी गॅस स्वस्त झाला होता. एका वर्षात केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ३०० रुपयांची कपात केली आहे. तर आता किंमतीत वाढ झाली आहे.

आजपासून दरवाढ

आज १ ऑगस्टपासून मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडर ८०२.५० रुपयांना मिळणार आहे. तर १९ किलोच्या निळ्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६०५ रुपये झाली आहे. त्यात ७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी हे दर १५९८ रुपये होते. देशभरात ही वाढ आज पासून लागू करण्यात आली आहे.NDA सरकारने पहिल्या अर्थसंकल्पानंतर सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरच्या किमती वाढवून मोठा धक्का दिला आहे.

हे सुद्धा वाचा

इतकी झाली वाढ

आज १ ऑगस्टपासून संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ८.५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तर मुंबईत ७ रुपयांनी दरवाढ झाली आहे. ही दर वाढ केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली.

मोठ्या शहरातील भाव काय

या दरवाढीमुळे व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत ७ रुपयांची दरवाढ झाली. राजधानी दिल्लीत गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६.५० रुपयांची वाढ दिसली. या शहरात सिलेंडरची किंमत १६५२.५० रुपये आहे. गेल्या महिन्यात हा भाव १६४६ रुपये होता. कोलकत्तामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ७.५० रुपयांची वाढ झाली. किंमती आता १७६४.५० रुपयांवर पोहचल्या. गेल्या महिन्यात येथे व्यावसायिक गॅसची किंमत १७५६ रुपये होता. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ७ रुपयांची दरवाढ झाली. भाव आता १६०५ रुपयांवर पोहचले. पूर्वी हा भाव १५९८ रुपये होता. चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव ७.५० रुपयांनी वधारला. किंमती आता १८१७ रुपयांहून १८०९.५० रुपयांवर पोहचला.

Non Stop LIVE Update
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.