Gautam Adani : ड्रोननंतर आता अदानी ग्रुपचा लवकरच विमान सर्व्हिस क्षेत्रात प्रवेश; 71 वर्ष जुन्या कंपनीत गुंतवणूक करणार!

गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेसने व्यावसायिक ड्रोन बनवणाऱ्या बेंगळुरूस्थित एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. यानंतर आता लवकरच अदानी ग्रुप विमान सर्व्हिस क्षेत्रात प्रवेश करणार आहे.

Gautam Adani : ड्रोननंतर आता अदानी ग्रुपचा लवकरच विमान सर्व्हिस क्षेत्रात प्रवेश; 71 वर्ष जुन्या कंपनीत गुंतवणूक करणार!
गौतम अदानी Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 10:51 AM

मुंबई : भारतातील बडा उद्योग समूह म्हणून अदानी समूहाची (Adani Group) ओळख आहे. अदानी समूहाकडून सध्या आपल्या व्यवसायाचा झपाट्याने विस्तार सुरू आहे. अदानी समूहाने नुकताच ड्रोन क्षेत्रात (drone field)प्रवेश केला आहे. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी एंटरप्रायझेसने व्यावसायिक ड्रोन बनवणाऱ्या बेंगळुरूस्थित एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. अदानी समूहाने जनरल एरोनॉटिक्समध्ये गुंतवणूक करून ड्रोन क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता ड्रोन क्षेत्रानंतर अदानी समूह नवनवीन क्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून अदानी समूह लवकरच विमान क्षेत्रात देखील प्रवेश करण्याची शक्यता आहे. देशातील सात विमानतळांचे व्यवस्थापन करणारा अदानी समूह मुंबईस्थित एअर वर्क्स ग्रुपमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर येत आहे. एअर वर्क्स ग्रुप लुफ्थांसा, तुर्की एअरलाइन्स, फ्लाय दुबई, एतिहाद, आणि व्हर्जिन अटलांटिक यासह एक डझनहून अधिक विदेशी विमान कंपन्यांना सेवा पूरवतो.

71 वर्ष जुनी कंपनी

एअर वर्क्स ग्रुप ही विमान सेवा क्षेत्रातील भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नात अदानी ग्रुप असल्याची बातमी समोर येत आहे. एअर वर्क्स ग्रुप ही 71 वर्ष जुनी कंपनी असून, या कंपनीचा विस्तार देशातील एकूण 27 शहरांमध्ये आहे. ही कंपनी भारतामधील डिगो, गो-एअर आणि विस्तारासोबतच लुफ्थांसा, तुर्की एअरलाइन्स, फ्लाय दुबई, एतिहाद, आणि व्हर्जिन अटलांटिक यासह एक डझनहून अधिक विदेशी विमान कंपन्यांना सेवा पुरवते. एवढेच नाही तर या कंपनीकडून भारतीय नौदलालाही सेवा पुरवण्यात येते. या महिन्याच्या सुरुवातीला या कंपनीने बोइंगसोबत करार केला आहे.

हे सुद्धा वाचा

देशातील सात विमानतळांचे व्यवस्थापन

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली अदानी समूह वेगवेगळ्या क्षेत्रात झपाट्याने विस्तार करत आहे. सध्या अदानी समूहाकडे देशातील सात विमानतळांचे व्यवस्थापन आहे. त्यामध्ये अहमदाबाद, लखनौव, तिरुअनंतपुरम, जयपूर, गुवाहाटी, मुंबई आणि मंगळुरू विमानतळाचा समावेश आहे. अदानी समूहाने नुकतेच ड्रोन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांनी ड्रोन बनवणाऱ्या बेंगळुरूस्थित जनरल एरोनॉटिक्समध्ये गुंतवणूक केली आहे. आता लवकरच अदानी समूह विमान क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.