Gautam Adani : आणखी एक सिमेंट कंपनी गौतम अदानी यांच्या खिशात! शेअरमध्ये उसळी

Gautam Adani : हिंडनबर्गच्या धक्क्यातून सावरत अदानी समूहाने मोठी झेप घेतली. अंबुजा सिमेंटने बाजारातील मोठी सिमेंट कंपनी पंखाखाली घेतली. अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येताच बाजारात या कंपनीच्या शेअरने उसळी घेतली.

Gautam Adani : आणखी एक सिमेंट कंपनी गौतम अदानी यांच्या खिशात! शेअरमध्ये उसळी
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 3:05 PM

नवी दिल्ली | 03 ऑगस्ट 2023 : हिंडनबर्ग अहवालानंतर दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचा समूह हादरला. 23 जानेवारी 2023 रोजी हा अहवाल समोर आला. अदानी समूहाचे शेअर धडाधड कोसळले. कंपनीला पुढील तीन महिन्यात अनेक दिव्यांना सामोरे जावे लागेल. अनेक गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री केली. अदानी समूह या संकटातून हळूहळू बाहेर आला. आता अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंटने आणखी एक सिमेंट कंपनी खिशात घातली. या कंपनीने 5,000 कोटी रुपयांची मोठा करार (Adani Group Mega Deal) केला. या अधिग्रहणाची माहिती अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले. सांघी इंडस्ट्रीजमध्ये अदानी समूहाने मोठा हिस्सा खरेदी केली. सांघी इंडस्ट्रीज (Sanghi Industries) पश्चिम भारतातील मोठी सिमेंट उत्पादक कंपनी आहे.

56.74 टक्के हिस्सा खरेदी

हा करार पूर्ण झाल्यावर गौतम अदानी यांनी ट्विट केले. अंबुजा सिमेंट 2028 पर्यंत सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अदानी पोर्टफोलिओत आता सांघी इंडस्ट्रीज पण सहभागी झाला आहे. अदानी समूहाची अंबुजा सिमेंटने, सांघी इंडस्ट्रीज लिमिटेडचे सध्याचे प्रमोटर्स, रवी सांघी आणि त्यांच्या कुटुंबियांचा कंपनीतील 56.74 टक्के वाटा खरेदी केला.

हे सुद्धा वाचा

मोठा सौदा

गुरुवारी कंपनीकडून याविषयीची माहिती देण्यात आली. हिंडनबर्ग अहवालात अदानी समूहावर आर्थिक क्षेत्रात अनियमिततेचे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतरचा हा सर्वात मोठा सौदा आहे. येत्या तीन ते चार महिन्यात अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

अल्ट्राटेकनंतर अंबुजा दुसरी मोठी कंपनी

या सौद्यानंतर अंबुजा सिमेंटचा क्षमता वाढून 7.36 कोटी टन वार्षिक होईल. अल्ट्राटेकनंतर अंबुजा सिमेंट ही सिमेंट उद्योगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी झाली आहे. अदानी समूह गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अंबुजा सिमेंट आणि तिची सहायक कंपनी एससी लिमिटेड यांच्या आधारे सिमेंट सेक्टरमध्ये उतरली होती.

दुप्पट उत्पादनाचे उद्दिष्ट

एसआयएलच्या (SIL) अधिग्रहणानंतर अंबुजा सिमेंट लिमिटेडने (ACL) बाजारात मोठी झेप घेतली आहे. ही कंपनी बाजारात मोठी उलाढाल करेल. कंपनीची सिमेंट उत्पादन क्षमता 6.75 कोटी टनाहून वाढून ती 7.36 कोटी टन होईल. गौतम अदानी यांच्या दाव्यानुसार, 2028 पर्यंत सिमेंटचे उत्पादन 14 कोटी टन वार्षिक इतके होईल.

असे वाढेल उत्पादन

गौतम अदानी यांच्या दाव्यानुसार, अंबुजा सिमेंटकडे सध्या एक अब्ज टन चुन्याचे दगड आहे. कंपनीकडे मोठे भंडार आहे. तर अंबुजा सिमेंट पुढील दोन वर्षांत सांघीपुरमची क्षमता वाढवून वार्षिक दीड कोटी टन करेल.

शेअरमध्ये उसळी

गुरुवारी ट्रेडिंग सेशनमध्ये अंबुजा सिमेंटच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिकची उसळी आली. सांघी इंडस्ट्रीजच्या शेअरने पण 5 टक्क्यांची उसळी घेतली.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.