AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani | गौतम अदानी तेजीच्या लाटेवर, खरेदी केली ही मीडिया कंपनी

Gautam Adani | अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गने अदानी समूहाला यावर्षात जोरदार झटका दिला. या समूहाचे मोठे नुकसान झाले. अदानीचे शेअर घसरले. आता या समूहासाठी अनेक चांगल्या वार्ता येऊन धडकल्या आहेत. अमेरिकन सरकारने हिंडबनर्गचा अहवाल विश्वसनीय नसल्याचे म्हटले आहे. अडानी समूहात अनेक घडामोडी घडत आहे. समूहाने ही मीडिया कंपनी खरेदी केली आहे.

Gautam Adani | गौतम अदानी तेजीच्या लाटेवर, खरेदी केली ही मीडिया कंपनी
| Updated on: Dec 16, 2023 | 3:03 PM
Share

नवी दिल्ली | 16 डिसेंबर 2023 : अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गने यावर्षात अदानी समूहाला जोरदार झटका दिला. अदानी साम्राज्य हादरले. समूहाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अदानी समूहाच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण झाली. अमेरिकन सरकारने याप्रकरणात सखोल तपास केला असता अदानी समूहाला क्लीन चिट मिळाली. अमेरिका सरकारने अदानी समूहाविरोदातील हिंडनबर्ग रिपोर्ट खोटा ठरवला. हा रिपोर्ट आल्यानंतर अदानी समूहाचे चांगले दिवस सुरु झाले. समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर बाजारात उसळले. अदानी समूहाने विस्ताराचे धोरण सुरु केले आहे. मीडियामध्ये यापूर्वीच कंपनी उतरली आहे. आता गौतम अदानी यांनी न्यूज एजन्सी IANS India खरेदी केली आहे.

अजून एक मीडिया कंपनी खिशात

अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी अनेक कंपन्या खरेदीचा सपाटा लावला आहे. यापूर्वीच त्यांनी मीडिया कंपनीचे अधिग्रहण केले होते. आता त्यांनी वृत्त संस्था IANS India ची खरेदी केली आहे. समूहाने याविषयीची माहिती शेअर बाजाराकडे नोंदवली. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेजने शेअर बाजाराला याविषयीची माहिती दिली. AMJ Media Network Ltd ने IANS India च्या इक्विटी शेअरमध्ये 50.50 हिस्सा खरेदी केला. अर्थात हा करार किती रुपयांत ठरला याची माहिती समोर आली नाही.

अदानी यांच्याकडे दोन मीडिया कंपनी

अदानी समूहाकडे अगोदरच दोन मीडिया कंपन्या आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात अदानी समूहाने क्विंटिलियन बिजनेस मीडियाचे अधिग्रहण केले होते. तर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अदानी यांनी NDTV Media मधील 65 टक्के वाटा खरेदी केला होता. आता अदानी यांच्या ताफ्यात तिसरी मीडिया कंपनी दाखल झाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात आयएएनएसचा महसूल 11.86 कोटी रुपये होता.

या कंपनीतील वाटा विक्री

अदानी समूहाने एकीकडे कंपन्यांचा विस्तार सुरु केला असताना एका उपकंपनीतील वाटा विक्री केला आहे. Adani Port ची एक उपकंपनी एन्नोर कंटेनर टर्मिनलमधील वाटा विक्री केला. कंपनीतील 49 टक्के वाटा 247 कोटी रुपयांना विक्री केल्याचे समोर येत आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीने याविषयीचे फायलिंग केले. मेडिटेरेनियन शिपिंग कंपनीसोबत हा करार पूर्ण करण्यात आला.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.