Gautam Adani News : Jio कंपनीला टक्कर देण्यासाठी कोण उतरतंय मैदानात? काय आहे गौतम अडाणी यांचा प्लॅन, ग्राहकांना काय होणार फायदा

5 G Spectrum : रिलायन्स कंपनीचा सध्या टेलिकॉम सेक्टरमध्ये दबदबा आहे. या कंपनीला गौतम अडाणी यांचा समूह लवकरच टक्कर देऊ शकतो. 4 कंपन्या शुक्रवारी 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या.

Gautam Adani News : Jio कंपनीला टक्कर देण्यासाठी कोण उतरतंय मैदानात? काय आहे गौतम अडाणी यांचा प्लॅन, ग्राहकांना काय होणार फायदा
जिओला लवकरच टक्कर?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 10:56 AM

Adani in 5 G Spectrum Auction : रिलायन्स कंपनीचा (Reliance) सध्या टेलिकॉम सेक्टरमध्ये (Telecom Sector) दबदबा आहे. Jio या कंपनीला गौतम अडाणी (Gautam Adani) यांचा समूह लवकरच टक्कर देऊ शकतो. 4 कंपन्या शुक्रवारी 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलाव ( 5 G Spectrum Auction) प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. जर या लिलावात सर्व योजनेप्रमाणे घडले तर, मुकेश अंबानी यांच्या जियोला (Jio) आणि सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेल (Airtel) कंपनीला अदानी यांच्या समुहाकडून बाजारात कडव्या स्पर्धेला तोंड द्यावे लागू शकते. अडाणी समूह त्यांच्या नवीन टेलीकॉम नेटवर्क सुरु करण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा समुह टेलिकॉम सेक्टरमध्ये उडी घेण्याची चर्चा रंगली होती. 9 जुलै शनिवारी सायंकाळी उशीरा अडाणी समुहाने (Adani Group) प्रेस रिलीज प्रसिद्धीसाठी दिली. त्यात 8 जुलै, शुक्रवारी ज्या चार कंपन्यांनी 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. त्यात अडाणी समूह पण सहभागी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता या स्पर्धेत काटे की टक्कर होणार हे स्पष्ट आहे.

या चार कंपन्यांचा सहभाग

8 जुलै, शुक्रवारी ज्या चार कंपन्यांनी 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत, त्यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि अडाणी समुहाचा सहभाग आहे. गौतम अडाणी समुहाने शनिवारी दुरसंचार स्पेक्ट्रमच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, अडाणी समूह दूरसंचार स्पेक्ट्रमचा वापर हा त्यांच्या अख्त्यारीतील विमानतळ आणि त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी करणार आहे. समुहाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या लिलाव प्रक्रियेतून देशात लवकरच 5जी सेवांची पायाभरणी होणार आहे. अतिजलद आणि वेगवान संवाद आदान-प्रदान करण्याचे तंत्रज्ञान देशात येऊ घातले आहे. या बोली प्रक्रियेत अडाणी समूह पण सहभागी होणार आहे. आता अडाणी समुहाचा सरळ सामना हा रिलायन्स जिओ आणि दूरसंचार क्षेत्रातील दुसरी दिग्गज कंपनी एअरटेलसोबत होणार आहे.

हे सुद्धा वाचा

लिलावाचे मूल्य 4.3 कोटी

कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचा उद्देश स्पष्ट केला आहे. देशभरातील अख्त्यारीतील विमानतळ, बंदर आणि लॉजिस्टिक, वीज निर्मिती, ट्रान्समिशन, वितरण आणि विविध उत्पादन ऑपरेशन्समध्ये सायबर सुरक्षेसोबत खासगी नेटवर्कची उभारणी करण्यासाठी कंपनी या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार आहे. 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावात 72,097.85 मेगाहर्ट्स स्पेक्ट्रमसाठीचे लिलाव मूल्य 4.3 कोटी असेल. गौतम अडणी आणि मुकेश अंबानी हे दोन्ही उद्योगपती गुजरात राज्यातून येतात. आतापर्यंत दोन्ही उद्योग समूह वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होते. त्यांच्यात आतापर्यंत कोणतीही स्पर्धा नव्हती. आता या माध्यमातून दोन्ही समूह एकाच क्षेत्रात आमने सामने येणार आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.