गौतम अदानी यांचा एक निर्णय आणि कंपनीसह गुंतवणूकदार झाले मालामाल
Gautam Adani : अदानी समूहाने व्यवसाय वाढीसाठी कंबर कसली आहे. गेल्या वर्षी अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्गच्या आरोपानंतर आता कंपनी नुकसान भरुन काढत आहे. काही दिवसांपूर्वीच अदानी कुटुंबाने अंबुजा सिमेंटमध्ये हिस्सा वाढविण्याची घोषणा केली. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. कंपनीसह गुंतवणूकदार मालामाल झाले.
अदानी समूहाने अनेक आरोपांना मागे टाकले आहे. गेल्या वर्षी हिंडनबर्गचे भूत समूहाच्या मानगुटीवर बसल्याने मोठा फटका बसला होता. अदानी समूहाचे सर्वच शेअर जमिनीवर आले होते. आता कंपनी हे सर्व नुकसान भरुन काढण्याच्या तयारीत आहे. अंबानी कुटुंबियांनी अंबुजा सिमेंटमध्ये हिस्सा वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. कंपनीचा शेअर 2 टक्क्यांनी उसळला. अंबुजा सिमेंटमध्ये अदानी कुटुंबियांनी 6,661 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
काय झाला बदल?
- अदानी कुटुंबियांच्या या खरेदीनंतर देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या सिमेंट कंपनीत त्यांची टक्केवारी 3.6 टक्क्यांपर्यंत वाढून 66.7 टक्के इतकी झाली आहे. गौतम अदानी यांच्या मालकीची कंपनी अंबुजा सिमेंटने या घडामोडींबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. या गुंतवणुकीचा फायदा कंपनीला व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी होईल, असे मत कंपनीने मांडले. अंबानी सिमेंट 2028 पर्यंत सिमेंट उत्पादन 14 कोटी टनप्रति वर्ष करण्याच्या तयारीत आहे.
- यापूर्वी ऑक्टोबर 2022 संचालक मंडळाने वॉरंट जारी करावे यासाठी प्रवर्तक अदानी कुटुंबाने कंपनीत 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अंबुजा सिमेंट्सकडे एसीसी सिमेंटमध्ये पण मोठा वाटा आहे.
इतका आहे वाटा
- या नवीन घडामोडींमुळे अदानी कुटुंबियांची कंपनीतील टक्केवारी 3.6 टक्क्यांनी वाढून एकूण 66.7 टक्के इतकी झाली आहे. अंबुजा सिमेंट्सचे सीईओ अजय कपूर यांनी सांगितले की, ही गुंतवणूक कंपनीच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. व्यवसाय वृद्धीसाठी कंपनी काम करत असल्याची ही पावती असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
- या घडामोडींमुळे अंबुजा सिमेंटचा शेअर आज तेजीत होता. आज या शेअरमध्ये 1.91 टक्क्यांची तेजी दिसून आली. आज बाजार बंद होताना शेअर 613 रुपयांवर पोहचला. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 625 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 354 रुपये अशी आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.