Gautam Adani यांच्या हाती लागला ‘परीस’! मिनिटाला छापले 48.35 कोटी

Gautam Adani Networth | आरोपांचे मळभ हटल्यानंतर, अदानी समूहासाठी गेल्या आठवड्यापासून अनेक आघाड्यांवर आनंदवार्ता येऊन धडकल्या आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीत दोनच दिवसांत 16.71 अब्ज डॉलरची भर पडली. सोमवार आणि मंगळवारी तर त्यांनी प्रत्येक मिनिटाला 48.35 कोटी कमाई करण्याचा विक्रम केला. पण यावर्षात संपत्ती गमावण्यात अजूनही ते पहिल्या स्थानावरच आहेत.

Gautam Adani यांच्या हाती लागला 'परीस'! मिनिटाला छापले 48.35 कोटी
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 9:32 AM

नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : गेल्या दोन दिवसांत, सोमवार आणि मंगळवारी गौतम अदानी यांनी नवा विक्रम केला. त्यांच्या संपत्तीत 16.71 अब्ज डॉलरची भर पडली. अदानी समूहाला गेल्याआठवड्यापासून अनेक आघाड्यांवर आनंदवार्ता येत आहे. या समूहाचे शेअर सध्या वाऱ्याशी स्पर्धा करत आहेत. अदानी समूहाच्या 10 कंपन्यांच्या शेअर्सनी मोठी उसळी घेतली आहे. अदानी यांच्या संपत्तीत गेल्या 28 तासांत प्रत्येक मिनिटाला 48.35 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. पण अदानी यांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. यंदा संपत्ती गमावणाऱ्या उद्योजकात जागतिक पातळीवर ते आघाडीवर आहेत.

13,92,62,72,74,500 रुपयांची कमाई

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती आता 82.5 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. अर्थात ही सोमवार आणि मंगळवारची आकडेवारी आहे. त्यात बुधवारची कमाई जोडलेली नाही. अदानी यांच्या संपत्तीत मंगळवारी 12.3 अब्ज डॉलरचा वाढ झाली. सोमवारी संपत्तीत 4.41 अब्ज डॉलरची भर पडली. म्हणजे दोन दिवसांत त्यांच्या संपत्तीत 16.71 अब्ज डॉसर म्हणजे 1671 कोटी डॉलरची वाढ झाली. सध्या डॉलरच्या तुलनेत त्याचा विचार करता, 83.34 रुपये प्रति डॉलरने ही रक्कम 13,92,62,72,74,500 रुपये इतकी होते. म्हणजे अदानी यांनी या 48 तासांत प्रत्येक मिनिटाला 48.35 कोटी रुपयांची कमाई केली.

हे सुद्धा वाचा

संपत्ती गमावण्यात पण नंबर वन

गौतम अदानी यांचे सध्या नशीब फळफळले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपत्तीत वाढ झाली असली तरी त्यांचा एक रेकॉर्ड अजून मोडीत निघाला नाही. संपत्तीत गमाविणाऱ्या अब्जाधीशांमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आहेत. 24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्ग रिपोर्ट जाहीर झाला. त्यानंतर त्यांचा पडता काळ सुरु झाला. त्यांना मोठा झटका बसला. त्यांची संपत्ती 130 अब्ज डॉलरवरुन थेट 50 अब्ज डॉलरपर्यंत घसरली. सध्या गौतम अदानी यांची संपत्ती 82.5 अब्ज डॉलर इतकी आहे. अजूनही त्यांना 38 अब्ज डॉलरचे नुकसान होत आहे.

असा केला रेकॉर्ड

सोमवारी गौतम अदानी यांनी एकाच दिवसात ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, जवळपास 4 अब्ज डॉलरपेक्षा जास्त कमाई केली.  मंगळवारी केवळ 24 तासात झटपट 12.3 अब्ज डॉलर कमावले. एकाच दिवसात अदानी यांच्या कमाईचा आकडा एलॉन मस्क, जेफ बेजोस आणि बर्नार्ड अर्नाल्ट या तीन दिग्गजांपेक्षा अधिक आहे. एकाच दिवसात एलॉन मस्क याने 2.25 अब्ज डॉलर, जेफ बेजोसने 1.94 अब्ज डॉलर तर बर्नार्ड अर्नाल्ट यांनी 2.16 अब्ज डॉलरची कमाई केली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.