Gautam Singhania | गौतम सिंघानिया यांनी अखेर सोडले मौन! कर्मचाऱ्यांना दिला हा संदेश

Gautam Singhania | खासगी आयुष्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने रेमंडचे मोठे नुकसान झाले. गौतम सिंघानिया यांनी दिवाळीत पत्नी नवाज मोदीपासून फारकत घेत असल्याचे समाज माध्यमावर जाहीर केले होते. त्यानंतर अनेक वादळं येऊन गेली. या कठीण प्रसंगात त्यांनी रेमंडच्या कर्मचाऱ्यांना भावनिक साद घातली आहे. काय केले त्यांनी आवाहन..

Gautam Singhania | गौतम सिंघानिया यांनी अखेर सोडले मौन! कर्मचाऱ्यांना दिला हा संदेश
Image Credit source: Gautam Singhania's X Handel
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 9:37 AM

नवी दिल्ली | 28 नोव्हेंबर 2023 : रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघानिया (Gautam Singhania) आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्यातील कौटुंबिक वाद जगजाहीर झाला. दोघांचा प्रत्येक दिवस नवीन आरोपांसह उगवतो. दिवाळीत गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट टाकत ही दिवाळी नेहमीसारखी आनंददायी नसल्याचे सांगितले आणि पत्नीपासून फारकत घेत असल्याचे जाहीर केले. त्यावर नवाज मोदी सिंघानिया यांनी त्यांच्यावर पलटवार केला. मारहाणीचे आरोप केले. त्यांचे वडील विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) यांनी गौतम यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली आणि सूनेची कड घेतली. या सर्व घडामोडींमुळे रेमंडच्या शेअरला मोठा फटका बसला. 1700 कोटी रुपयांचे बाजारातील भांडवल घसरले. 13 नोव्हेंबरनंतर गौतम सिंघानिया यांनी कोणतीची प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण त्यांनी आता रेमंडच्या कर्मचाऱ्यांशी, संचालकांशी संवाद साधला आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला आहे. त्यात त्यांनी ही भावनिक साद घातली आहे.

कामकाजावर नाही होणार परिणाम

रेमंडचे चेअरमन आणि एमडी गौतम सिंघानिया यांनी संचालक मंडळ, कर्मचारी यांना ई-मेल पाठवला. त्यात मीडियातील खासगी वादावरच्या बातम्यांचा पाऊस पडल्याचा उल्लेख केला आहे. पण खासगी आयुष्यातील या वादळाचा रेमंडच्या कामकाजावर, व्यापारावर, व्यवसायावर कुठलाच परिणाम होणार नसल्याचे वचन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. कुटुंबाच्या सन्मानासाठी हे मौन धारण केल्याचे ते म्हणाले. एमडी आणि चेअरमन म्हणून माझी जबाबदारी याची मला जाणीव आहे. मी कामाप्रती समर्पित आहे. या कठीण प्रसंगात कंपनीच्या कामाकाजात कुठलाही अडथळा येणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

नवाजने केला मारहाणीचा आरोप

गौतम सिंघानिया यांच्या फारकतीच्या निर्णयाने कुटुंबातील वाद समोर आला. गौतम यांनी मुलीला आणि आपल्याला जबर मारहाण केल्याचा आरोप पत्नी नवाजने केला. नवाजने पोटगीसाठी कंपनीच्या जवळपास 1.4 अब्ज डॉलर संपत्तीपैकी 75 टक्के वाट्यावर दावा ठोकला आहे. रेमंड समूह हा टेक्सटाईल आणि कपड्यांच्या सेगमेंटमध्ये जागतिक पातळीवरील मोठा ब्रँड आहे. कंझ्युमर केअर, बांधकाम आणि इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये पण त्याचा दबदबा वाढत आहे.

कंपनीच्या घौडदौडीचा केला उल्लेख

सिंघानिया यांनी कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी कंपनीच्या घौडदौडीचा उल्लेख केला आहे. रेमंड समूह गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उंचावत आहे. तिमाही निकाल पण उत्साहवर्धक आहे. इंजिनिअरिंग सेक्टरमधील व्यवसाय दुप्पट झाला आहे. डिफेंस, एअरोस्पेस आणि इलेक्ट्रिक व्हेईकल सेक्टरमध्ये रेमंड उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेअरधारक, गुंतवणूकदार, संचालक, कर्मचारी आणि ग्राहक या सर्वांच्या मदतीने रेमंड समूह अजून घौडदौड करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.