Vehicle insurance : वाहन विम्याचे नूतनीकरण वेळेत करा, अन्यथा खावी लागेल तुरुंगाची हवा; सोबतच मोठा दंडही

कार आणि दुचाकी वाहनांसाठी मोटर वाहन कायदा 2019 अंतर्गत एक दंड निश्चित करण्यात आलाय. विम्याशिवाय पहिल्यांदा पकडल्यास 2000 रुपये दंड आणि 3 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.

Vehicle insurance : वाहन विम्याचे नूतनीकरण वेळेत करा, अन्यथा खावी लागेल तुरुंगाची हवा; सोबतच मोठा दंडही
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 11:30 AM

सिग्नलवर उभ्या असलेल्या अभिषेकच्या कारला (car) मागून एका कारनं धडक दिली. कारचं नुकसान झाल्यानं अभिषेकला खूप राग आला. मात्र, त्याला स्वत:वर जास्त राग आला. कारण त्याला कार विमा पॉलिसीचं (Insurance policy) नूतनीकरण (Renewal) करण्यासाठी वेळ न मिळाल्यानं पॉलिसी रद्द झाली होती. त्यामुळे अभिषेकला झालेल्या नुकसानीचा खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागणार आहे. यासाठी वेळेवर कारच्या विम्याचे नूतनीकरण करणे महत्त्वाचे आहे.

विमा पॉलिसी रद्द झाल्यास दंड

ट्रॅफिक पोलिसांनी जर तुम्हाला विम्याशिवाय कार चालवताना पकडले तर त्याचे परिणाम काय होतात हे जाणून घेऊयात कार आणि दुचाकी वाहनांसाठी मोटर वाहन कायदा 2019 अंतर्गत एक दंड निश्चित करण्यात आलाय. पहिल्यांदा पकडल्यास 2000 रुपये दंड आणि 3 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. दुसऱ्यांदा पकडले गेल्यास दंडाची रक्कम दुप्पट होते म्हणजेच 4000 रुपये आणि 3 महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

पॉलिसी रद्द झाल्यास वाहनाच्या मालकाला त्याच्या स्वतःच्या वाहनाला झालेल्या नुकसानाव्यतिरिक्त थर्ड पार्टीमधील ज्याच्या गाडीचे नुकसान झाले आहे, त्याचे देखील नुकसान भरून द्यावे लागते. सप्टेंबर 2018 पासून थर्ड पार्टी म्हणजेच TP विमा बंधनकारक करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

समोरच्या व्यक्तीच्या अपघातग्रस्त वाहनाचे नुकसान हे थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाते. थर्ड पार्टी वाहन किंवा ड्रायव्हरला झालेल्या दुखापतीसाठी 7.5 लाख रुपयांचे कव्हर थर्ड पार्टी अंतर्गत दिले जाते. पॉलिसी रद्द झाल्यास या खर्चाचा समावेश यामध्ये होत नाही, तसेच शिक्षाही होते.

या प्रकरणात मिळत नाही विम्याचा लाभ

चक्रीवादळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे वाहनांचे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळत नाही. तसेच गाडी चोरीला गेल्यास विम्याचा लाभ मिळत नाही. कार किंवा दुचाकीच्या कर्जाची परतफेड झाल्यानंतर मालकाच्या नावावर नोंदणी करणं आवश्यक आहे. परंतु पॉलिसी रद्द झालेली असल्यास वाहनाची नोंदणी देखील करता येत नाही.

पॉलिसीचे वेळेत नूतनीकरण न केल्यास पॉलिसी नूतनीकरणात खंड पडतो. इन्शुरन्स कंपन्या सामान्यतः पॉलिसी नूतनीकरणासाठी 15 ते 30 दिवस अधिकचा कालावधी देतात. परंतु 90 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास नवीन विमा पॉलिसी खरेदी करावी लागते. नवीन विमा पॉलिसी घेताना वाहनाची पुन्हा तपासणी केली जाते. तसेच नो क्लेम बोनस सवलतही मिळत नाही.

पॉलिसी रद्द न होण्यासाठी सोप्या टीप्स

विमा पॉलिसी रद्द होऊ नये यासाठी तुमच्या फोनवर एक्सपायरी डेट रिमाइंडर सेट करा. नवीन वाहन घेणाऱ्यांसाठी सप्टेंबर 2018 पासून थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक करण्यात आलंय, कारसाठी 3 वर्षाचे आणि दुचाकीसाठी 5 वर्षांचा थर्ड पार्टी कव्हर आठवणीने घ्या. जर 2018 पूर्वी वाहन खरेदी केले असेल तर थर्ड पार्टी विमा वेगळा घ्यावा लागतो हे लक्षात ठेवा.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.