Twitter : कपाळावर मारुन घेतला हात, मस्कच्या 8 डॉलरच्या फेऱ्यात या कंपनीने 1500 कोटी गमावले..
Twitter : ट्विटरच्या चक्करमध्ये एका कंपनीला तब्बल 1500 कोटींचा फटका सहन करावा लागला.
नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) ताब्यात घेतल्यानंतर ब्लू टिकच्या (Blue Tick) माध्यमातून कमाईचा निर्णय घेतला. त्याला जगभरातील युझर्संनी विरोध केला आहे. या योजनेमुळे एका जागतिक औषधी निर्मिती कंपनीचे चक्क बनावट अकाऊंट तयार करण्यात आले आणि त्यातून जो काही गोंधळ घालण्यात आला की विचारता सोय नाही.
या सर्व प्रकारात कंपनीला एवढं मोठं नुकसान सहन करावे लागेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. केवळ 8 डॉलर देऊन एका युझरने या कंपनीचे बनावट ट्विटर अकाऊंट तयार केले. ते अधिकृत असल्यासारखे भासवले.
या बनावट खात्यावरुन कंपनी इन्सुलिन मोफत वाटप करणार असल्याचे ट्विट करण्यात आले आणि व्हायचा तो गोंधळ उडालाच. या कंपनीला या फेक ट्विटमुळे तब्बल 1500 कोटी (15 Billions Dollar) रुपयांचा फटका बसला.
Eli Lilly या कंपनीला हा फटका सहन करावा लागला आहे. ही अमेरिकेतील मोठी औषध निर्मिती कंपनी आहे. या कंपनीच्या बनावट खात्यावरुन मोफत इन्सूलन वाटप करण्याचे ट्विट करण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी या कंपनीचे शेअर बाजारात जोरदार घसरले.
ट्विटरने दोन दिवसांपूर्वी ब्लू टिकसाठी वर्गणी सुरु केली होती. कोणताही युझर आठ डॉलर देऊन ब्लू टिक खरेदी करु शकतो. त्याचा अनेक युझर्स गैरफायदा घेत आहेत. अनेक दिग्गज ब्रँडला यामुळे झटका बसला आहे. त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
ब्लू टिक सशुल्क करण्याचा खटाटोप अंगलट आल्यानंतर सरतेशेवटी मस्कने ही योजनाच गुंडाळून टाकली आहे. सध्या ही योजना बंद करण्यात आली आहे. ट्विटरवर सर्व जगातून या गोष्टींचा मोठा दबाव वाढला होता.
We apologize to those who have been served a misleading message from a fake Lilly account. Our official Twitter account is @LillyPad.
— Eli Lilly and Company (@LillyPad) November 10, 2022
पण तोपर्यंत अनेक कंपन्यांना मोठा दणका बसला. बोगस अकाऊंट तयार करुन त्यावरुन अनेक चुकीचे ट्विट करण्यात आले. त्याचा बाजारावर मोठा परिणाम झाला. Eli Lilly या कंपनीला तर त्याचा मोठा फटका सहन करावीा लागला. त्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले.
हा सर्व गोंधळ माजल्याने कंपनीला ही काही काळ काय होत आहे हे उमगेना. पण जेव्हा कंपनीला ट्विटरवरुन हा सर्व गोंधळ उडाल्याचे दिसून आल्यावर त्याच माध्यमातून कंपनीने गुंतवणूकदारांना संदेश दिला.
कंपनीने त्यांच्या अधिकृत खात्यावरुन ट्विट केले आणि गुंतवणूकदारांच्या मनातील संभ्रम दूर केला. पण तोपर्यंत मोठा उशीर झाला होता. या कंपनीला भारतीय चलनात जवळपास 1500 कोटींचा फटका सहन करावा लागला. या सर्व गोंधळामुळे ट्विटरने ब्लू टिकसाठीची सशुल्क सेवा काही काळासाठी बंद केली आहे.