ICICI interest rate : आयसीआयसीआय बँकेकडून ग्राहकांना गिफ्ट, एफडीच्या व्याज दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

आयसीआयसीआय बँकेकडून एफडीवरील व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांची बँकेत दोन कोटींपेक्षा कमी रुपयांची एफडी आहे, अशा सर्वच ग्राहकांना या नव्या व्याज दराचा फायदा होणार आहे.

ICICI interest rate : आयसीआयसीआय बँकेकडून ग्राहकांना गिफ्ट, एफडीच्या व्याज दरात वाढ; जाणून घ्या नवे दर
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 9:50 AM

मुंबई : खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) फिक्स्ड डिपॉझिटवरील (Fixed Deposit) व्याज दरात वाढ केली आहे. ज्यांची आयसीआयसीआय बँके दोन कोटींपेक्षा कमी रुपयांची एफडी आहे, अशा सर्वांनाच बँकेच्या या नव्या व्याज दराचा फायदा होणार आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार ज्या एफडी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत, तसेच ज्यांचा कालावधी हा 290 दिवस ते 10 वर्षांचा आहे अशा सर्वच एफडीवर व्याज दर (FD Interest Rates) वाढवण्यात आले आहेत. बँकेने केलेल्या नव्या बदलानुसार आता ज्या एफडींचा कालावधी हा 7 ते 29 दिवसांचा आहे, त्या एफडीवर आता बँकेकडून 2.50 व्याज देण्यात येणार आहे. ज्या एफडीचा कालावधी हा तीस दिवस ते 90 दिवसांचा आहे त्यावर 3.5 टक्के व्याज दर दिला जाणार आहे. तर ज्या एफडीचा कालावधी हा 185 ते 289 दिवसांचा आहे, त्या एफडीवर आता 4.50 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

व्याज दर नेमके किती वाढले

आयसीआयसीआय बँकेच्या वतीने एक ते दोन वर्षांच्या कालवधीसाठी असलेल्या एफडीवरील व्याज दरात दहा बेसीस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे. आता ज्या एफडीचा कालावधी हा एक ते दोन वर्षांचा आहे. त्यांना आपल्या एफडीवर 5.10 टक्के व्याज दर मिळणार आहे. ज्या ग्राहकांची बँकेत दोन वर्ष एक दिवस ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी एफडी आहे. त्यांना 5.40 टक्क्यांनी व्याज मिळणार आहे. म्हणजेच बँकेने या प्रकारच्या एफडीवर 20 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे.

ज्या ग्राहकांची आयसीआयसीआय बँकेत तीन वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी एफडी आहे त्यांना बँकेकडून 5.60 टक्के दराने व्याज देण्यात देण्यात आहे. पूर्वी हेच रेट 5.45 इतके होते, म्हणजे आता त्यात 15 बेसीस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे. तसेच ज्या ग्राहकांनी आयसीआयसीआय बँकेत पाच वर्ष एक दिवस ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी एफडी केली आहे, त्यांना बँकेच्या वतीने 5.75 टक्के व्यज देण्यात येणार आहे. पूर्वी दहा वर्षाच्या एफडीचा व्याज दर हा 5.60 एवढा होता. त्यात आता 15 बेसीस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

ग्राहकांना महागाईपासून दिलासा

दरम्यान आयसीआयसीआय बँकेने आपल्या एफडीवरील व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने याचा फायदा बँकेतील हजारो ठेवीदारांना होणार आहे. त्यांचे एफडीवरील उत्पन्न वाढून महागाच्या काळात त्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.