AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gita Gopinath : IMF मध्ये महिलाराज, भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी

जियोफ्रे ओकामोटो यांच्या जागी भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांची निवड करण्यात आली आहे. गीता गोपीनाथ 21 जानेवारीला फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

Gita Gopinath : IMF मध्ये महिलाराज, भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी
गीता गोपीनाथ
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 8:04 AM

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (International Monetary Fund) च्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर जियोफ्रे ओकामोटो (Geoffery Okamoto) पुढील वर्षी राजीनामा देणार आहेत. ओकामोटो यांच्या जागी भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांची निवड करण्यात आली आहे. गीता गोपीनाथ 21 जानेवारीला फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

एएनआयचं ट्विट

गीता गोपीनाथ कोण आहेत?

गीता गोपीनाथ सध्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. गीता गोपीनाथ यांचे संशोधन लेख मूर्धन्य इकॉनॉमिक्स जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. आयएमएफमध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करण्याअगोदर गीता गोपीनाथ या हॉवर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील आंतरराष्ट्रीय स्टडीज अँड इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. गीता गोपीनाथ यांची ऑक्टोबर 2018 मध्ये चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून आयएमएफमध्ये निवड झाली होती. त्या जानेवारी 2022 मध्ये हॉवर्ड विद्यापीठात पुन्हा काम करण्यासाठी जाणार होत्या. गीता गोपीनाथ यांचा जन्म भारतात झाला आहे मात्र त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून गुरुवारी ओकामोटो जानेवारीमध्ये त्यांच्या पदावरुन राजीनामा देणार आहेत. आयएमफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ त्यांच्या पदावर काम पाहतील अशी घोषणा करण्यात आली आहे. आयएमएफनं गीता गोपीनाथ यांनी त्यांच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून असलेल्या कार्यकाळात महत्वाची भूमिका पार पाडल्याचं सांगितलं आहे. पॅनडेमिक पेपरमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. संपूर्ण जगभरातील कोरोना विषाणू संसर्ग समाप्त करण्यासाठी काय करावं लागेल यासंबंधी त्यांनी मांडणी केली. जगभरात लसीकरण करण्याचं ठरवण्यात आलं. त्यानुसार आयएमएफ, जागतिक बँक आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या नेतृत्त्वात मल्टीलॅटरल टास्क फोर्स स्थापन करण्यात आला होता.

गीता गोपीनाथ यांची प्रतिक्रिया

गीता गोपीनाथ यांनी यांनी आयएमएफच्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्ट पदावरील निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे. महामारीच्या काळात आयएमफनं केलेलं काम अतिशय महत्त्वाचं आहे. महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं गीता गोपीनाथ यांनी म्हटलं आहे.

गीता गोपीनाथ यांचं ट्विट

आयएमएफ मध्ये महिलाराज

आयएमफच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून क्रिस्टैलिना जियोर्जिवा कार्यरत आहेत. आता जानेवारीपासून गीता गोपीनाथ या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यानिमित्तानं जगातील सर्वात प्रमुख आर्थिक संस्थेचा कारभार दोन महिला पाहणार आहेत. क्रिस्टैलिना जियोर्जिवा यांनी गीता गोपीनाथ यांच्या निवडीवर “द राईट पर्सन अ‌ॅट द राईट टाईम” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

इतर बातम्या:

नशीबच पालटलं! IIT च्या विद्यार्थ्याला उबरकडून थेट 2 कोटींपेक्षा जास्त पगाराची ऑफर

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, आता बिल्डरांच्या मनमानीला बसणार चाप

Gita Gopinath will succeed Geoffery Okamote as first Deputy Managing director of IMF

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.