World Economy : जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात, शेअर बाजारात गुंतवणूक करावी की करु नये?
World Economy : जागतिक अर्थव्यवस्था सध्या धोक्यात आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तुमची गुंतवणूक फायद्याची राहील की धोक्याची..
नवी दिल्ली : यापूर्वी कोविड 19 (Covid-19) आणि आता महागाई (Inflation), भाववाढ (Rate Hike), कच्च्या तेलाचे वाढीव दर आणि भूराजकीय वादामुळे जगभरातील अर्थव्यवस्था (Global Economy) मेटाकुटीला आल्या आहेत. त्याचा थेट परिणाम या देशांच्या वित्तीय परिस्थितीवर दिसून येत आहे. त्यामुळे शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही जरा गृहपाठ करावा इतकाच याचा अर्थ आहे..
आतंरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMP) जागतिक अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे सावट असल्याचा दावा केला आहे. तसेच येत्या काही दिवसात, पुढील वर्षापर्यंत जगातील सर्वच अर्थव्यवस्थांना दबाव सहन करावा लागणार असल्याचे IMP ने स्पष्ट केले आहे. IMF प्रमुख क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी याविषयीचा इशारा दिला आहे.
IIFL, VP-रिसर्च, अनुज गुप्ता यांनी शेअर बाजारावरही याचा परिणाम होणार असल्याचे सांगितले. जागतिक रेटिंग संस्था त्यामुळेच प्रत्येक देशातील वृद्धीचा अंदाज कमी करत आहेत. जागतिक बाजार घसरणीचा इशारा देत आहे. अमेरिकन केंद्रीय बँकेने सातत्याने व्याजदर वृद्धी केल्याने तसेच इतर युरोपियन बँकांनीही व्याजदर वाढवल्याने मंदीचा आशंका प्रबळ होत आहे.
सध्या शेअर बाजारावर या सर्व गोष्टींचा परिणाम दिसून येत आहे. परदेशी गुंतवणूकदार सातत्याने त्यांच्याकडील शेअरची विक्री करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमची ठरु शकते. केंद्रीय बँकांनी महागाईचा विषय योग्यरितीने हाताळल्यास शेअर बाजार सावरु शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
IMF ने जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 4 लाख कोटीपर्यंत घसरण येण्याची शक्यता वर्तवली आहे. 2026 पर्यंत ही घसरण होण्याचा अंदाज आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक देशांना मोठ्या संकटांचा सामना करण्याची शक्यता आहे.