Godrej Group : या एका आयडियामुळे उभा राहिला गोदरेज समूह! 3000 रुपयांच्या कर्जावर या वकिलाने सुरु केला उद्योग
Godrej Group : कधी कधी एखादी गोष्ट तुमचे आयुष्य बदलवू शकते. हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो. गोदरेज समूहाची उभारणी अशीच हटके कल्पनेवर झाली. 3000 रुपयांच्या कर्जावर या उद्योग समूहाची सुरुवात झाली.
नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : साबण, आलमारी, फ्रीज, वॉशिंग पाऊडर, हेअर कलर, कुलूप, फर्निचर, मॉस्किटो स्प्रे पासून ते चंद्रयान मोहिमेला सहकार्यपर्यंत गोदरेज (Godrej Group) नाव जोडल्या गेले आहे. गोदरेज समूहाची अनेक उत्पादने घरोघरी मिळतात. किचनपासून ते बाथरुमपर्यंत आणि बेडरुमपासून ते ड्राईंगरुमपर्यंत अनेक उत्पादने गोदरेज तयार करते. पण गोदरेज समूहाची सुरुवात होण्याची कहाणी अत्यंत रोचक आहे. एखाद्या घटनेतून काय आयडिया मिळेल आणि त्यातून काय बदल घडेल हे सांगता येते नाही. असाच प्रकार या उद्योग समूहासोबत घडला. या टर्निंग पाईंटपासून या समूहाने मागे वळून पाहिले नाही. 3000 रुपयांच्या कर्जावर या उद्योग समूहाची सुरुवात झाली. आज हा ब्रँड जगभर पसला आहे.
वकिलाने सुरु केली कंपनी
आज जगातील 90 हून अधिक देशांमध्ये गोदरेज समूहाचे उत्पादन विक्री होतात. गोदरेज कंपनीची सुरुवात एका वकिलाने केली होती, हे अनेकांना माहिती नाही. कायद्याची पदवी घेतल्यानंतर आर्देशिर गोदरेज (Ardeshir Godrej) यांनी ज्येष्ठ वकिलाचे ऑफिस ज्वॉईन केले. 1894 मध्ये त्यांना सॉलिसिटर फर्मने पूर्व आफ्रिकेत पाठवले. पण त्यांना लवकरच लक्षात आले की, या व्यवसायात त्यांना गती नाही. त्यांनी भारतात आल्यावर व्यवसायाला रामराम ठोकला. त्यांनी एका दुकानात कामाला सुरुवात केली.
वृत्तपत्रातील बातमीने मिळाली आयडिया
एक दिवस वृत्तपत्रातील बातमी वाचताना, त्यांची नजर एका बातमीवर खिळली. त्यात मुंबईमध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याचे लिहिले होते. ही बातमी चोरीच्या घटनांविषयी होती. घर, कार्यालयात चोरीचे प्रमाण वाढल्याचे त्यात लिहिले होते. येथूनच आर्देशिर गोदरेज यांना उद्योगाची कल्पना सुचली. त्यांनी कुलूप विक्रीची कंपनी सुरु करण्याच निश्चय केला. गोदरेजच्या मजबूत कुलूपांची निर्मिती सुरु झाली.
या ठिकाणी घेतली जागा
बॉम्बे गॅस वर्क्सच्या जवळ त्यांनी 215 चौरस जागेत एक गोदाम होते. त्यात त्यांनी कुलूप बनविण्याचा कारखाना सुरु केला. 1897 मध्ये अशाप्रकारे गोदरेज कंपनीचा जन्म झाला. हे कुलूप देशभरात लागलीच लोकप्रिय झाले. गावागावात गोदरेजचे कुलूप पोहचले.
3000 रुपयांचे कर्ज
पारसी समाजातील मेरवानजी मुचेरजी कामा यांच्याकडून गोदरेज यांनी कुलूपाचा कारखाना सुरु करण्यासाठी 3000 रुपये उसणे घेतले होते. त्यानंतर त्यांनी या कर्जाची परतफेड केली. या आर्थिक पाठबळामुळे त्यांच्या उद्योगाला गती मिळाली.
ब्रिटिश कंपनीशी भांडण
सर्जरी ब्लेडवर ‘मेड इन इंडिया’ टाकण्याच्या त्यांच्या अग्रहामुळे त्यांचे ब्रिटिश कंपनीसोबत वाजले. मेड इन इंडिया ही मोहर उमटविण्यासाठी गोदरेज आग्रही होते. तर ब्रिटिश कंपनीचा त्यासाठी विरोध होता. त्यामुळे गोदरेज यांनी कंपनीशी करार मोडीत काढला. त्यामुळे त्यांना मोठी ऑर्डर मिळाली नाही.
अनेक उत्पादने बाजारात
गोदरेज ब्रदर्सने व्यवसायाची वृद्धी केली. विस्तार केला. कुलूपानंतर व्हेजिटेबल ऑईल साबण त्यांनी बाजारात आणली. गोदरेज नंबर 1, सिंथॉल या साबणाची विक्री मोठी आहे. 1951 मध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीत गोदरेज यांनी 17 लाख बॅलेट बॉक्स तयार केले. 1958 मध्ये त्यांनी देशातील पहिला फ्रिज तयार केला आणि त्याची विक्री केली. त्यानंतर लिक्विड हेअर कलर, गुड नाईट ब्रँडसह अनेक उत्पादनं त्यांनी बाजारात आणली.
चंद्रयान मोहिमेत मोठे योगदान
गोदरेज कंपनीने 2008 मध्ये चंद्रयान-1साठी व्हेईकल आणि ल्यूनर ऑर्बिटर तयार केले. कंपनी सीसीटीव्ही पासून ते बांधकाम, दूध उत्पादनात आघाडी घेतली. आज कंपनीचा कारभार 90 देशांमध्ये आहे. तर कंपनीचे बाजारातील भांडवल 76 अब्ज डॉलरपर्यंत पोहचले आहे.