Gold Silver Price Update : सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड! भावात हनुमान उडी, चांदीचा पण विक्रम

Gold Silver Price Update : सोन्याने अखेर हनुमान उडी मारलीच. कालच चांदीने मुसंडी मारली होती. सोने-चांदीने यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. चांदीने तर अपेक्षेच्या पलिकडे कारनामा केला. आजचा भाव किती आहे.

Gold Silver Price Update : सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड! भावात हनुमान उडी, चांदीचा पण विक्रम
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 9:23 AM

नवी दिल्ली : सोन्याने अखेर हनुमान उडी मारलीच. कालच चांदीने मुसंडी मारली होती. सोने-चांदीने (Gold Silver Price Update) यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. चांदीने तर अपेक्षेच्या पलिकडे कारनामा केला. चांदीच्या किंमती 6 एप्रिल रोजी पुन्हा वधारल्या. सोन्याने खरेदीदारांच्या तोंडचे पाणी पळवले. गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या किंमतींनी रेकॉर्डवर रेकॉर्ड केले आहे. पण मध्यंतरी सोने घसरले होते. त्यानंतर सोने आणि चांदी सूसाट आहेत. त्यांनी खरेदीदारांची झोप उडवली. आज सोन्याच्या दरांनी अनेकांची झोप उडाली आहे. गुंतवणूकदारांना (Investors) मात्र सोने आणि चांदीच्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळाला आहे.

दोन महिन्यात विक्रम मोडीत सोन्याने सर्वात अगोदर 2 फेब्रुवारी रोजी विक्रम केला होता. त्यानंतर सोन्याने 19 मार्च रोजी 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर सोन्याचा भाव 59,000 ते 60,000 रुपयांच्या दरम्यान खेळत होते. आज सकाळी सोन्यात 1030 रुपये तोळा भाव वाढ झाली. 6 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,510 रुपये झाला. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत.

चांदीची जोरदार मुसंडी चांदीने सोन्यापेक्षा अधिक परतावा दिला आहे. चांदीने भावात नवीन विक्रम केला आहे. चांदीने किंमतीत जोरदार मुसंडी मारली. 5 एप्रिल रोजी सकाळी चांदी 74600 रुपये प्रति किलो होती. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. 4 एप्रिल रोजी एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये होता. . 5 एप्रिल रोजी संध्याकाळी एक किलो चांदीचा भाव 77,090 रुपयांवर पोहचला. तर 6 एप्रिल रोजी चांदी किलोमागे 2490 रुपयांनी वधारली. आज चांदीचा प्रति किलो भाव 77,090 रुपये झाला.

हे सुद्धा वाचा

चार शहरातील भाव गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,250 रुपये होती. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 61,360 रुपये होता. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 56,250 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,360 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 56,250 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,360 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 56,280 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,390 रुपये आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....