AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold- Silver Price Today : सोन्यावर पुन्हा दबाव, जाणून घ्या काय आहेत आजच्या सोन्या-चांदीच्या किंमती

Gold Rate Today : आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी सत्रात सोने आणि चांदीच्या किंमतीवर दबाव दिसून येत आहे. डॉलर इंडेक्समध्ये तेजी आणि भारतातील महागाईचा परिणाम सोन्यासह चांदीवर दबाव टाकत आहे.

Gold- Silver Price Today : सोन्यावर पुन्हा दबाव, जाणून घ्या काय आहेत आजच्या सोन्या-चांदीच्या किंमती
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 15, 2022 | 3:27 PM
Share

Gold Silver Price Today : डॉलरच्या तुलनेत रुपयाने (Rupee against Dollar) पुन्हा आज आपटी खाल्ली. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत 163 रुपयांची घसरण दिसून आली. आज वायदे बाजारात सकाळी 10:15 वाजता MCX वर ऑगस्ट डिलिव्हरी असलेल्या सोन्यात (Gold Silver Rate Today) 8 रुपयांची घसरण आली. सोने सकाळी 50२२० रुपयांवर व्यापार करत होते. तर ऑक्टोबर डिलिव्हरी असलेल्या सोन्याच्या किंमतींनी 22 रुपयांची उसळी घेतली आणि सोने 50,566 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. चांदीमध्ये(Silver) आज थोडीशी घसरण दिसून आली. तर डिसेंबर डिलिव्हरी असलेल्या चांदीत 81 रुपयांची घसरण आली, चांदी 55,925 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यापार करीत होती. तर सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत थोडीफार सुधारणा दिसून आली. तर चांदी घसरली. कालच्या तुलनेत आज सोने चांदीच्या दराच किंचत घट झाली असून आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,910 प्रति 10 ग्रॅम आहे. तर आजचा प्रती एक किलो चांदीचा भाव 56,449 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

राज्यातील चार शहरांतील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार(Good Return Website) मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,170 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,910 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,980 आहे. नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,980 आहे. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 46,980 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये आहे.आजचा प्रती एक किलो चांदीचा भाव 56,449 रुपये आहे.

अशी तपासा सोन्याची शुद्धता

सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

अशी तपासा सोन्याची शुद्धता

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

  1. 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.
  2. 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.
  3. 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.
  4. 18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.
  5. 14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.