Gold Price Today : आज पुन्हा घसरले सोने-चांदी! गुंतवणूकदारांना खरेदीची सुवर्णसंधी
Gold Price Today : आज सोने-चांदी खरेदीची सुवर्णसंधी आहे. सोन्याने झेप घेत विक्रम केला होता. त्यापेक्षा सध्याच्या भावात मोठी पडझड झाली आहे. सोने खरेदीचा विचार करत असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही.
नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण झाली आहे. सोन्याने 2 फेब्रुवारी 2023 रोजी भावात विक्रम केला होता. पण त्यानंतर सोन्याने गिरकी घेतली. भावात प्रचंड पडझड झाली. जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्याने (Price Down) खरेदीचा योग जुळून येऊ शकतो. सोन्याचा भाव घसरुण 57,000 रुपयांच्या स्तरावर तर चांदीच्या किंमती 67,000 रुपयांपर्यंत खाली आली आहेत. तज्ज्ञांच्या मते ही घसरण काही दिवसांपुरती आहे. येत्या काही दिवसात सोने 65000 रुपये तर चांदी 80000 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
सोन्याने काही दिवसांपूर्वी त्याचा ऑल टाईम हाय 58,847 रुपये गाठला होता. 2 फेब्रुवारी 2022 रोजी सोन्याने ही कामगिरी बजावली होती. आताचा विचार करता सोने 1822 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. तर चांदी ही तिच्या ऑल टाईम उच्चांकापेक्षा स्वस्त विक्री होत आहे. चांदीचा उच्चांकी भाव 79980 रुपये प्रति किलो आहे. 13609 रुपये प्रति किलोने चांदी स्वस्त मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही किंमती धातूंचे दर घसरले आहेत. मंगळवारी वायदे बाजारात (MCX) दुपारी सोन्यात 255 रुपयांची वृद्धी दिसली. सोने 56752 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होते. तर चांदीत 144 रुपयांची वाढ झाली. चांदी 66288 रुपये प्रति किलोवर होती. यापूर्वी सोमवारी सोने 56497 रुपये आणि चांदी 66144 रुपये प्रति किलो वर बंद झाली.
सराफा बाजारात मंगळवारी सोने-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. इंडिया बुलियन्स असोसिएशनने (https://ibjarates.com) भावचा फलक जाहीर केला. त्यानुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरुन 57025 रुपये प्रति 10 ग्रॅमवरुन घसरली. चांदीत किंचित दरवाढ झाली. चांदीचा भाव 66387 रुपये प्रति किलोवर पोहचला. सोमवारी सोने 57060 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 66371 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
सोन्याच्या किंमतीवर 3 टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्ज वेगळे द्यावे लागतात. जर तुम्ही आज सोने खरेदी करत असाल तर 57025 रुपया व्यतिरिक्त जीएसटी आणि मेकिंक चार्ज वेगळे द्यावे लागतील. मंगळवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 56797 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा भाव 52235 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 42769 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला.
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.