Gold Silver Price Today News | सणासुदीत गुड न्यूज, सोन्याचे ही आज रक्षा बंधन ! सोन्याच्या दरात 1.25 टक्क्यांची घसरण, काय आहेत आजचे दर?

Gold Silver Price Today News | रक्षा बंधनाच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1.25 टक्क्यांची घसरण, काय आहेत आजचे दर?

Gold Silver Price Today News | सणासुदीत गुड न्यूज, सोन्याचे ही आज रक्षा बंधन ! सोन्याच्या दरात 1.25 टक्क्यांची घसरण, काय आहेत आजचे दर?
आजचे सोन्या चांदीचे दर?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 11:57 AM

Gold Silver Price Today News | सोन्याने आज सणसुदीत गुडन्यूज दिली आहे. सोन्याने ही दराबाबत रक्षा बंधन केले आहे. बुधवारच्या तुलनेत 22 कॅरेट सोन्याच्या भावात (Gold Rate Today) 1.25 टक्‍क्‍यांनी आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 1.26 टक्‍क्‍यांनी घसरली आहे. 8 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची भारतातील किंमत आज 37,880 रुपये आहे, जी कालच्या 38,360 रुपयांच्या तुलनेत 480 रुपयांनी घसरली आहे. 8 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत काल 41,848 रुपयांच्या तुलनेत आज 41,320 रुपये आहे. त्यामुळे बहिणीला भावाकडे हक्काने सुवर्ण भेट मागता येईल. तर भावाला ही सोन्याचे एखादे गिफ्ट (Gift) देताना भाव कमी असल्याने फायदा होणार आहे. डॉलर कमकुवत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोन्याचे भाव अस्थिर आहेत. आज रुपयाने (Rupees) मजबूत दावेदारी केली. सोन्याचे दर देशातील प्रत्येक शहरात वेगवेगळे आहेत. गुजरातमध्ये बुलियन एक्सचेंज सुरु झाल्याने काही दिवसांनी हा फरक ही राहणार नाही.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,350 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,650 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,380 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,690 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,380 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,490 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,380 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,690 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 587 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

हे सुद्धा वाचा

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...