Today Gold Rate : जागतिक तेजीचा नाही परिणाम, स्वस्तात सोने खरेदीची मोठी संधी
Today Gold Rate : सोने आणि चांदीच्या किंमतीत आज घसरण झाली. खरेदीदारांना मोठी संधी आहे. जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती वधारल्या आहेत. त्याचा काहीच परिणाम झालेला नाही.
नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या (Gold Silver) किंमती सातत्याने वाढत आहे. पण आज, बुधवारी या तेजीच्या सत्राला किंचित ब्रेक लागला आहे. भावात किचिंत घसरण झाली आहे. मंगळवारच्या भावापेक्षा आज घसरण दिसून आली. लग्नसराईत सराफा बाजारात आज खरेदीची संधी आहे. वायदे बाजारात ही भाव घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) आज किंमतीत वाढ झालेली आहे. पण त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर झाला नाही. या महिन्यात सोन्याने 58 हजारांपेक्षा जास्त विक्रमी टप्पा गाठला. चांदीनेही किंमतीत चढाई केली आहे. येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव 60 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. तर चांदीच्या किंमती 80 हजारांचा टप्पा गाठतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.
वायदे बाजारात (MCX) आज सोन्याच्या भावात किंचित घसरण झाली. सोने काल 57257 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. आज या किंमतीत 27 रुपयांची घसरण झाली. सोने सुरुवातीच्या व्यापारी सत्रात तेजीत राहिले. पण नंतर त्यात घसरण दिसून आली. सोने आज एमसीएक्सवर 57230 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत आहे. सोन्याने आज 57145 रुपयांपर्यंत नीच्चांकी तर 57259 रुपयांची उच्चांकी झेप घेतली. सोन्याचे एप्रिल वायदे बाजारातील किंमतही दिलासा देणारी आहे.
चांदीचा भाव लवचिक राहिले. चांदी आज 67500 रुपयांच्यावर व्यापार करत आहे. सोने काल 67529 रुपये प्रति किलो होते. आज भावात 4 रुपयांची घसरण झाली. आज किंमती 67525 रुपये प्रति किलो आहेत. चांदी एमसीएक्सवर नीच्चांकी किंमत 67402 रुपये प्रति किलो तर 67677 रुपये प्रति किलो उच्चांकी स्तरावर आहे.
भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.
अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते. शुद्ध सोन्याचा भाव जास्त असतो.
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.