Gold Silver Price : खुशखबर! बजेट पूर्वी सोने-चांदी स्वस्त, खरेदीदारांना मोठी संधी

Gold Silver Price : सोन्या चांदीत घसरण झाल्याने खरेदीदारांना मोठी संधी मिळाली आहे.

Gold Silver Price : खुशखबर! बजेट पूर्वी सोने-चांदी स्वस्त, खरेदीदारांना मोठी संधी
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 4:39 PM

नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यास आता अवघा एक दिवस उरला आहे. बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करतील. देशात सोन्याचा भाव एकसारखा नसतो. प्रत्येक शहरात, सराफा बाजारात सोन्याच्या भावात (Gold Price) तफावत दिसते. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर सोन्या-चांदीचे भाव जाहीर करण्यात आले आहेत. आज सोन्याचा भाव 57041 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला. गेल्या व्यापारी सत्रात हा भाव 57079 रुपयांवर बंद झाला होता. प्रति 10 ग्रॅममागे भावात 38 रुपयांची घसरण झाली. सोन्याच्या उच्चांकी दरापेक्षा सध्या सोने 281 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. 24 जानेवारी 2023 रोजी सोने 57322 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. हा सोन्याचा विक्रम होता. आज चांदीचा भाव (Silver Price) 67949 रुपये प्रति किलोवर उघडला. गेल्या व्यापारी सत्रात चांदी 68149 प्रति किलोवर बंद झाली होती. चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्यात तेजी आहे. फेब्रुवारी महिन्यात सोन्याचा फ्युचर ट्रेडमध्ये 8.00 रुपयांची आघाडी दिसून आली. हा भाव 56,790.00 रुपये आहे. तर मार्च 2023 मधील फ्यूचर ट्रेडमध्ये चांदीत 461.00 रुपयांची घसरण दिसून आली. चांदीचा भाव 68,128.00 ट्रेड करत आहे.

24 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 57,322 रुपये प्रति 10 असा उच्चांकी होता. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपयांचा रेकॉर्ड तयार केला होता. म्हणजे दोन वर्षांत सोने 1000 रुपयांनी वधारले आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काळात सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचेल. तर चांदीचा भाव 80 हजार रुपयांच्या पुढे जाईल.

हे सुद्धा वाचा

भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.

अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते.

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.