Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Latest price: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरात घट, आजचे भाव…

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाजारात सोने आणि चांदीची चमक (Gold price bullion market) फिकी पडलीय. पहिल्याच दिवशी दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर (Gold price today) 20 रुपयांनी आणि चांदीचे दर 404 रुपयांनी कमी झाले आहेत.

Gold-Silver Latest price: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरात घट, आजचे भाव...
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 4:21 PM

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाजारात सोने आणि चांदीची चमक (Gold price bullion market) फिकी पडलीय. पहिल्याच दिवशी दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर (Gold price today) 20 रुपयांनी आणि चांदीचे दर 404 रुपयांनी कमी झाले आहेत. दरातील घसरणीसह या आठवड्यात सोन्याचे दर प्रति तोळा 49 हजार 678 रुपये आणि चांदीचे दर (Silver price today) 67 हजार 520 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. HDFC सिक्युरिटीने ही माहिती दिली (Gold and Silver rate latest price of 2 January 2021).

31 डिसेंबर 2020 रोजी सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold rate 2020) 49 हजार 698 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर (Silver rate 2020) 67 हजार 924 रुपये प्रति किलोग्रॅम होते. कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या दरात सुरुवातीला किरकोळ वाढ दिसली. MCX वर फेब्रुवारीत डिलिव्हर होणारं सोनं नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 84 रुपयांनी महागलं. या दिवशी बाजार 50 हजार 235 रुपये दरासह बंद झाला. एप्रिलमध्ये डिलिव्हर होणाऱ्या सोन्याच्या दरात 136 रुपयांच्या वाढीसह 50 हजार 319 रुपये इतका दर झाला.

MCX वर चांदीचे दर काय?

चांदीबाबतही दरांमध्ये काहीशी वाढच होताना दिसली. MCX वर मार्चमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या दरात (Silver delivery price) 15 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीचे दर 68 हजार 120 रुपयांवर पोहचले. मात्र, मे महिन्यात डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या दरात 18 रुपयांची घट झाली. यासह चांदीचे दर 69 हजार 50 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने-चांदीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात (Gold international rate) किरकोळ वाढ झालेली पाहायला मिळाली. सोन्याचे दर 1900 डॉलरवर पोहचले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी फेब्रुवारीत डिलिव्हर होणारं सोनं 0.10 डॉलरच्या वाढीसह 1901.60 डॉलर प्रति आऊंसवर पोहचलं. मार्चमध्ये बाजारात येणाऱ्या चांदीचे दर (Silver international rate) 0.002 डॉलरच्या घटीसह 26.52 डॉलर प्रति आऊंसवर पोहचले आहेत.

मागील वर्षी सोन्यावर 30 टक्के परतावा

2020 मध्ये सोन्यावर जवळपास 30 टक्क्यांचा शानदार परतावा मिळाला होता. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या मनात यंदाच्या परताव्याबाबतही काही ठोकताळे आहेत. कमोडिटी मार्केटच्या तज्ज्ञांनुसार, नव्या स्टिमुलस पॅकेजची शक्यता लक्षात घेता यंदा सोन्याच्या दरात वाढ होईल. यावर्षी बाजारात सोने अगदी सहजपणे 60 हजाराचा टप्पा पार करेल. 2021 मध्ये सोन्याचे दर (Gold rate India) 63 हजार रुपये प्रति तोळा इथपर्यंत जाईल, असंही त्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा :

Gold Outlook 2021 : नववर्षात सोन्याची किंमत वधारणार, प्रतितोळा 63 हजारांचा टप्पा गाठणार!

Gold Treasure Discovered in Turkey : तुर्कीला सोन्याचं घबाड सापडलं, 99 हजार किलो सोन्याचा खजिना, किंमत तब्बल….

Gold Price Today: ख्रिसमसच्या आधी सोनं आणखी झालं स्वस्त, वाचा आजचे दर

Gold and Silver rate latest price of 2 January 2021

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.