Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा वाढला भाव, अशा वाढल्या किंमती

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने गेल्या तीन दिवसांत मोठा दिलासा दिला. सराफा बाजारात सध्या गर्दी उसळली आहे. सणासुदीत दागिने खरेदीला प्राधान्य देण्यात येते. अशावेळी बाजारात खरेदीला जाताना सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घ्या. शहरानुसार त्यात तफावत दिसते. स्थानिक कर आणि तर भावामुळे हा बदल दिसतो.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा वाढला भाव, अशा वाढल्या किंमती
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 8:35 AM

नवी दिल्ली | 3 नोव्हेंबर 2023 : दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. अनेकांनी दिवाळीत सोने-चांदी खरेदीचा संकल्प केला असेल. कोणाला गुंतवणूक करायची असेल तर काहींना दागिन्यांची हौस करायची असेल. पण ताज्या घडामोडींमुळे त्यांना अंदाजापेक्षा अधिकचा खर्च येईल. त्यांना हौसेसाठी अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत घसरण होती. जागतिक घडामोडींमुळे, युद्धामुळे भाव भडकले. किंमती चार हजारांनी वधारल्या. गेल्या तीन दिवसांत सोने-चांदीत (Gold Silver Price Today 3 November 2023) घसरण झाली. गुरुवारी भाव किंचित वाढले. सोने-चांदीचा असा आहे भाव..

सोने किंचित वधारले

ऑक्टोबरचे शेवटचे दोन दिवस आणि नोव्हेंबरची पहिली तारीख, अशा तीन दिवसांत सोन्यात 1020 रुपयांची स्वस्ताई आली. 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे 230 रुपये, 550 रुपये आणि 320 रुपयांनी किंमती घसरल्या. 2 नोव्हेंबर रोजी 110 रुपयांची दरवाढ झाली. आता 22 कॅरेट सोने 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

घसरणीनंतर चांदीत दरवाढ

गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती. गेल्या दोन दिवसांत, 31 ऑक्टोबर रोजी चांदीत 300 रुपयांची तर 1 नोव्हेंबर रोजी 1200 रुपयांची घसरण झाली होती. 2 नोव्हेंबर रोजी चांदीने 700 रुपयांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,800 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,092 रुपये, 23 कॅरेट 60,847 रुपये, 22 कॅरेट सोने 55,960 रुपये झाले. 18 कॅरेट 45,819 रुपये, 14 कॅरेट सोने 35,739 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 71,684 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.