Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold latest price: सोने खरेदीसाठी उत्तम संधी; भाव अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर

Gold rates | मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 14 एप्रिलनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात इतकी घसरण झालेली आहे. 14 एप्रिल रोजी MCX वर सोन्याचा बाजार बंद होतानाचा भाव प्रतितोळा 46831 रुपये इतका होता.

Gold latest price: सोने खरेदीसाठी उत्तम संधी; भाव अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर
गोल्ड एक्स्चेंजमुळे शेअर मार्केटप्रमाणे सोन्याचे व्यवहार होतील. एका गोल्ड रिसीटच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार पार पडतील. गोल्ड एक्स्चेंजमुळे सोन्याची किंमत आणि गुणवत्ता याची खात्री असेल.
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 1:00 PM

मुंबई: गेल्या काही काळापासून चढे असलेले सोन्याचे दर आता काहीसे स्थिरावताना दिसत आहेत. या आठवड्यात सोन्याच्या दरात (Gold Rate) अनेक चढउतार पाहायला मिळाले. शुक्रवारी बाजार बंद होताना मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याच्या दरात 86 रुपयांची तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा दर 46956 रुपये इतका झाला होता. (Gold rates in MCX market)

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 14 एप्रिलनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात इतकी घसरण झालेली आहे. 14 एप्रिल रोजी MCX वर सोन्याचा बाजार बंद होतानाचा भाव प्रतितोळा 46831 रुपये इतका होता. तर 15 एप्रिलला हाच दर प्रतितोळा 47401 रुपये इतका होता. या हिशेबाने सोन्याचे दर सध्या अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव वधारल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेची फेडरल बँक व्याजदर वाढवू शकते. त्याचाही परिणाम भारतीय भांडवली बाजारावर आणि सोन्याच्या दरांवर पाहायला मिळू शकतो.

भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

कोरोना संकटामुळे एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रोडावली असताना परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाल्याने देशाला मोठा झटका बसला आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. 18 जूनला परकीय चलन गंगाजळी 4.148 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन 603.933 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे.

परकीय मुद्रा भांडारातील युरो, पाऊंड आणि येनच्या या परकीय चलनांच्या विनिमय दरात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. यापूर्वी 4 जून रोजी Forex Reserves वाढ पाहायला मिळाली होती. कोरोनाच्या संकटकाळातही परकीय गुंतवणुकदारांनी भारतावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली होती.

संबंधित बातम्या:

तुम्ही सोने खरेदी आणि विक्री करता? तर जाणून घ्या कसा आणि किती लागतो टॅक्स…

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही

(Gold rates in MCX market)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.