पुढील आठवड्यात स्वस्त दरात सोन्यात गुंतवणुकीची संधी, जाणून घ्या दर ग्रॅमची किंमत

गोल्ड बाँडच्या माध्यमातून दरवर्षी सामान्य व्यक्ती 4 किलोग्रॅम, एचयूएफ 4 किलोग्रॅम ट्रस्ट आणि संस्था 20 किलोग्रॅमपर्यंत सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकते. गोल्ड बाँडवर दरवर्षी 2.5 टक्के दराने व्याजही मिळते.

पुढील आठवड्यात स्वस्त दरात सोन्यात गुंतवणुकीची संधी, जाणून घ्या दर ग्रॅमची किंमत
आजचे सोन्या चांदीचे दर?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 10:42 AM

स्वस्त दरात सोने हवे असेल तर एक सुवर्णसंधी आहे. गोल्ड बॉंड (Gold Bond) स्कीमचा पुढला अंक सबस्क्रीप्शनसाठी सोमवारपासून खुला होणार आहे. सरकारी स्वर्ण बाँड (SGB) योजनेमध्ये गुंतवणूकदार 22 ऑगस्टपासून (from 22 August) गुंतवणूक करू शकतात. ही योजना 5 दिवसांपर्यंत खुली राहणार आहे. सरकारने यासाठी इश्यू प्राइसही (Issue Price) जाहीर केली आहे. इश्यू प्राइस म्हणजे गेल्या आठवड्यातील बंद किमतींची सरासरी असते. आणि डिजीटल पेमेंट करणाऱ्यांना त्यामध्ये सवलतही मिळते. त्यामुळे सध्याच्या दरांपेक्षा स्वस्त दरांत गुंतवणूक करण्याची संधी मिळते. गोल्ड बाँड ही मुलांसाठी किंवा भविष्यात ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक (Investment in Gold) करायची आहे, त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना फक्त सोन्यातील वाढीचा फायदा मिळत नाही. तर त्यांना या काळात व्याजाद्वारे उत्पन्नही मिळते.

बाँड इश्यू प्राइस म्हणजे काय ?

2022-2023 मधील दुसऱ्या साखळी अंतर्गत सुवर्ण रोखे योजना 22 ते 26 ऑगस्ट या कालावधीत खरेदीसाठी उपलब्ध असेल, असे भारतीये रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. यासाठी इश्यू प्राइस 5,197 रुपये प्रति ग्रॅम इतकी ठेवण्यात आली आहे. ऑनलाइन अथवा डिजीटल माध्यमाद्वारे बाँडसाठी अर्ज देणाऱ्या आणि पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी इश्यू प्राइस प्रति ग्रॅम 50 रुपयांनी कमी होणार आहे. या गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँडची किंमत 5,147 रुपये इतकी असेल.

भारत सरकारच्या वतीने प्रत्यक्षात सेंट्रल बँक गोल्ड बाँड जारी करते. हे बाँड केवळ निवासी भारतीय व्यक्ती, अविभक्त हिंदू कुटुंब (एचयूएफ), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना विकले जाऊ शकते. दरवर्षी सबस्क्रिप्शनची कमाल मर्यादा सामान्य व्यक्तीसाठी आणि एचयूएफसाठी प्रत्येकी चार किलोग्रॅम आणि ट्रस्च अथवा संस्थांसाठी 20 किलोग्रॅम इतकी आहे. सोन्याची मागणी कमी करण्याच्या उद्देशाना नोव्हेंबर 2015 मध्ये प्रथमच गोल्ड बाँडची योजना सुरू करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

गोल्ड बाँड योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

हे गोल्ड बाँड रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येतात, त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने ते अतिशय सुरक्षित असतात. बाँडमधील गुंतवणूक ही सोन्याच्या प्रमाणावर आधारित असते. म्हणजे मॅच्युरिटी नंतर सोन्याच्या प्रमाणाच्या आधारेच पैसे भरावे लागतात. अशा परिस्थितीत सोन्याची् किंमत वाढल्यास तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा मिळू शकतो. बाँडबाबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यावर मिळणारे व्याज होय. गोल्ड बाँडमधील सुरुवातीच्या गुंतवणूकीत 2.5 टक्के दराने व्याज देण्यात येते. उदाहरणार्थ – जर तुम्ही 10 ग्रॅमचे गोल्ड बाँड घेतले असतील तर त्याचे गुंतवणूक मूल्य 51 हजार रुपये इतके असेल. मॅच्युरिटीच्यावेळी 10 ग्रॅम सोन्याची जी किंमत असेल त्याआधारे तुम्हाला पैसे दिले जातील. तसेच ५१ हजार रुपयांवर तुम्हाला वेळोवेळी व्याज मिळत राहील.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.