Gold Hallmarking | सराफा व्यापारांना मोठा दिलासा, हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय

येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हॉलमार्किंगच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यापारांवर कोणताही दंड आकारला जाणार नाही, अशी सूचना दिली आहे. (Gold Hallmarking no penalty till August said central government)

Gold Hallmarking | सराफा व्यापारांना मोठा दिलासा, हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय
gold
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 12:57 PM

मुंबई : गेल्या 15 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आलं आहे. या नव्या नियमानुसार, सराफा व्यापारांना 14, 18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असल्यावरच त्याची विक्री करता येणार आहे. मात्र नुकतंच केंद्र सरकराने सराफा व्यापारांना आणखी एक दिलासा दिला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हॉलमार्किंगच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यापारांवर कोणताही दंड आकारला जाणार नाही, असे आदेश सरकारने दिले आहे. (Gold Hallmarking no penalty will be imposed till August said central government)

केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सराफा व्यापारांनी याबाबतची विनंती केली होती. या विनंतीनंतर सरकारने येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हॉलमार्किंगच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यापारांवर कोणताही दंड आकारला जाणार नाही, अशी सूचना दिली आहे.

मात्र जर एखाद्या ग्राहकाने याबाबत तक्रार केली तर त्याच्या तक्रारीच्या नियमानुसार कारवाई केली जाईल. ग्राहक BIS CARE द्वारे किंवा ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या मदतीने ग्राहक पोर्टलवर तक्रारी करु शकता. देशात सोन्यावरील हॉलमार्किंग आतापर्यंत ऐच्छिक होते. मात्र 2019 मध्ये केंद्र सरकारने 15 जानेवारी 2021 पासून सोन्यावर हॉलमार्क अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. मात्र सोनारांनी जास्त वेळ मागितल्यानंतर अंतिम मुदत 15 जून 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

बीआयएसचे मोठे पाऊल

भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे. सराफा व्यापारांना नव्या यंत्रणेचे अनुपालन करण्यासाठी ऑगस्टमध्ये सरकारने कारवाई केली आहे. अनिवार्य हॉलमार्कच्या नियमांचे पालन न केल्यास दंड न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारांना दिलासा मिळेल.

बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो. हॉलमार्क केलेले दागिने विकायला व्यावसायिकाला काही अडचण नाही. पण या कायद्यात अशा काही तरतुदी आहेत ज्या सरकारने मागे घ्याव्यात. आता सरकारने व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिल्याने ज्वेलर्सना या प्रणालीची सवय लावण्यासाठी वेळ मिळेल.

हॉलमार्किंगचे 940 केंद्र उपलब्ध

?वर्ल्ड गोल्ड कॉऊन्सिलच्या मते, देशभरात एकूण 4 लाख ज्वेलर्स आहेत. ?यापैकी केवळ 35 हजार 879 सराफा व्यापारी हे बीआयएस प्रमाणित आहेत ?तर सध्याच्या केवळ 30 टक्के दागिने हॉलमार्क केलेले आहेत. ?सध्या देशभरात हॉलमार्किंगसाठी 940 केंद्र उपलब्ध आहेत ?देशातील 80 टक्के सोनं हे फक्त दागिन्यांसाठी वापरलं जातं.

(Gold Hallmarking no penalty will be imposed till August said central government)

संबंधित बातम्या : 

PHOTO | तुमच्याकडे असलेले सोनं खरं की खोटं? आता घरबसल्या करा शुद्धतेची तपासणी

सोन्यावर Hallmarking बंधनकारक, या ॲपच्या मदतीने जाणून घ्या सोनं खरं की खोटं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.