Gold Bond : अवघ्या 3 दिवसांची प्रतिक्षा, स्वस्त सोने खरेदीचा चुकवू नका मोका

Gold Bond : सोने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आली आहे. केंद्र सरकारने स्वस्तात सोने खरेदीचा खास मोका आणला आहे. त्यासाठी ग्राहकांना केवळ तीन दिवसांची प्रतिक्षा करावी लागेल. त्यांना सुवर्णरोख्यात गुंतवणूक करता येईल.

Gold Bond : अवघ्या 3 दिवसांची प्रतिक्षा, स्वस्त सोने खरेदीचा चुकवू नका मोका
परतावा सोन्यावाणी
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 3:31 PM

नवी दिल्ली : सोने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) स्वस्तात सोने खरेदीचा खास मोका आणला आहे. त्यासाठी ग्राहकांना केवळ तीन दिवसांची प्रतिक्षा करावी लागेल. त्यांना सुवर्णरोख्यात गुंतवणूक करता येईल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सार्वभौम सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bond-SGB) योजना आणण्याचे ठरले होते. अर्थ मंत्रालयाने सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना 2023-24 ची पहिली मालिका 19 ते 23 जून जून तर दुसरी मालिका 11 ते 15 सप्टेंबर या दरम्यान जाहीर करण्यात येणार आहे. या काळात सुवर्णप्रेमींना स्वस्त सोने खरेदी करता येईल.

कधी सुरु झाली योजना मोदी सरकार 2014 साली केंद्रात आले होते. त्यावेळी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणण्याचे निश्चित झाले होते. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. दरवर्षी ही सुवर्णसंधी मिळते. गोल्ड बाँडचा कालावधी आठ वर्षांसाठी आहे. 2017-18 मधील सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची ही तिसरी मालिका आहे. या मालिकेतून मुदतपूर्व रक्कम काढण्यासाठी  15 एप्रिल, 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

डिजिटल गोल्ड बाँड सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍या सवलत मिळते.

हे सुद्धा वाचा

ही आहे अट सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते.

इतका परतावा या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यापूर्वीच 5 व्या वर्षी योजनेतून बाहेर पडता येते.

सवलत मिळते गोल्ड बॉण्ड्स सरकारच्यावतीने RBI जारी करते. आतापर्यंत आरबीआयने गोल्ड बॉण्ड्सचे आठ टप्पे आले आहेत. या गोल्ड बॉण्ड्सची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीवर आधारित असते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍या आणि पैसे भरणार्‍या गुंतवणूकदारांना इश्यू किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट दिली जाते.

या ठिकाणी करता येईल खरेदी

  1. सुवर्ण बाँड सर्व बँकांमधून, त्यांच्या संकेतस्थळावरुन खरेदी करता येईल
  2. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL) मध्ये सुविधा
  3. जवळचे पोस्ट कार्यालय, तसेच पेमेंट बँका, त्यांचे ॲप, ऑनलाईन साईट यावरुन
  4. स्मॉल फायनान्स बँक, त्यांचे ॲप, संकेतस्थळ यावर घरबसल्या या योजनेत गुंतवणूक करता येईल

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.