Gold Silver Rate Today : सोन्याची मुंसडी, चांदीची उसळी, भाव असे चमकले

Gold Silver Rate Today : सोन्याने जोरदार उसळी घेतली आहे. चांदीने पण मोठी झेप घेतली. दोन्ही धातूंनी दबाव झुगारत मोठी मुसंडी मारली. शेअर बाजार तेजीत आहे. त्यातच सराफा बाजारानेही कमाल केली आहे.

Gold Silver Rate Today : सोन्याची मुंसडी, चांदीची उसळी, भाव असे चमकले
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 9:31 AM

नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : सोन्याने जोरदार उसळी घेतली आहे. तर चांदीने पण मोठी घेतली आहे. दोन्ही धातूंनी कमाल केली आहे. जुलै महिन्यात प्रत्येक दिवशी दोन्ही वरचढ ठरत आहेत. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होत आहे. शेअर बाजारात तेजीचे सत्र सुरु आहे. तर सराफा बाजाराने पण आगेकूच सुरु केली आहे. मे आणि जून महिन्यातील सर्व कसर जुलै महिन्यात भरुन निघेल, असा अंदाज आहे. हा सलग तिसरा महिना आहे, ज्यामध्ये सोने-चांदीला किंमतीचा नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. एका महिन्यापूर्वी सोने तर 58,000 रुपयांपर्यंत खाली आले. चांदीत पण मोठी घसरण झाली. या दोन्ही धातूंचे भाव घसरणीवर होते. पण जुलै महिन्यात आतापर्यंत भावाची जोरदार घौडदौड दिसून येत आहे. काय आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today)?

सोने-चांदीची मुसंडी

सोने आणि चांदीने जोरदार आघाडी उघडली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आता 20 जुलै पर्यंत सोने-चांदीत मोठी उसळी आली आहे. दोन्ही धातूंच्या किंमती वधारल्या आहेत. या महिन्यात सोन्याने 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने 6500 रुपयांची झेप घेतली आहे. अजून दोन्ही धातूंना किंमतीत नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही.

हे सुद्धा वाचा

काय आहे भाव

या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 17 जुलै रोजी किंमती 20 रुपयांनी घसरल्या. 22 कॅरेट सोने 55,130 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. 18 जुलै रोजी मोठी उलाढाल झाली नाही. तर 19 जुलै रोजी भावाने मोठी आघाडी घेतली. सोन्याने 670 रुपयांची उसळी घेतली. या महिन्यातील ही सर्वात मोठी झेप आहे. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 55,750 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,800 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वधारले.

चांदी वधारली

गुडरिटर्न्सनुसार, चांदी किलोमागे 6500 रुपयांपर्यंत वधारली. 5 जुलै रोजी 500, 6 जुलै रोजी 800, 8 जुलै रोजी 1000, मध्यंतरी 300, 13 जुलै रोजी 2000, 14 जुलै रोजी 1500 रुपये प्रति किलो किंमती वधारल्या. तर 18 जुलै रोजी किंमती 300 रुपयांनी वाढल्या. 19 जुलै रोजी किंमतीत 400 रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 78,400 रुपयांवर पोहचला.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,756 रुपये, 23 कॅरेट 59,517 रुपये, 22 कॅरेट सोने 54,737 रुपये, 18 कॅरेट 44,817 रुपये, 14 कॅरेट सोने 34,957 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.