Gold Share : ज्वेलर कंपन्यांचे शेअर्स सूसाट, तुमचं नशीब चमकणार का?

Gold Share : शेअर बाजारात ज्वेलर्सचे शेअर्स सूसाट आहेत. सराफा बाजारात सोने-चांदीत चढउतार होत असताना शेअर बाजारात मात्र सोन्याचे स्टॉक धमाल करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नशीब चमकले आहे.

Gold Share : ज्वेलर कंपन्यांचे शेअर्स सूसाट, तुमचं नशीब चमकणार का?
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 3:32 PM

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून सराफा बाजारात (Sarafa Bazar) नरमाईचे धोरण आहे. सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) घसरण दिसून आली. मे आणि जून महिन्यात सोन्याला नवीन उच्चांक गाठता आला नाही. सोन्याची किंमत 58,000 रुपयांपर्यंत घसरल्या होत्या. तर चांदीच्या किंमती कमी झाल्या. पण या महिन्यात मात्र चांगलीच दरवाढ झाली. सोने-चांदीने उसळी घेतली. सणासुदीच्या काळात सोन्याला मोठी मागणी येण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात (Share Market) तर ज्वेलर्सचे शेअर्स सूसाट आहेत. सराफा बाजारात सोने-चांदीत चढउतार होत असताना शेअर बाजारात मात्र सोन्याचे स्टॉक धमाल करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नशीब चमकले आहे.

शेअर बाजारात चमक गेल्या काही दिवसांपासून ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. कल्याण ज्वेलर्स, टायटन कंपनीच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली आहे. सोन्याच्या भावात चढउतार होत आहे. सोने आणि चांदीवर जागतिक बाजाराचा दबाव आहे. पण सणासुदीच्या काळात सोन्याला मोठी मागणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीचे सत्र आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

52 आठवड्यांच्या उच्चांकावर दक्षिण भारतातील ज्वेलरी व्यवसायावर लक्ष केंद्रित करणारी कंपनी Kalyan Jewellers चे शेअर शुक्रवारी तेजीत होते. या शेअर्सने उच्चांक गाठला. दिवसभराच्या व्यापारात हा शेअर 166.50 रुपयांवर पोहचला. मार्च 2021 नंतर या शेअरमधील हा सर्वात मोठा टप्पा आहे. इंट्राडेमध्ये हा शेअर 8 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 5.65 टक्क्यांसह बंद होणार आहे.

हे सुद्धा वाचा

कल्याण ज्वेलर्सची कामगिरी कल्याण ज्वेलर्सच्या सोन्याची मागणी जोरदार आहे. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील व्यवसायात अपडेट्स आले आहेत. त्यात व्यवसाय मजबूत असल्याचे दिसून आले. पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूलात 31% वाढ झाली. दक्षिण भारताच्या बाहेर महसूलात 34% वाढ झाली.

नवीन शोरुम उघडणार गेल्या 12 महिन्यात कंपनीने दक्षिण भारताच्या बाहेर जास्त शोरुम उघडले आहेत. पहिल्या तिमाहाती कंपनीने दक्षिण भारताच्या बाहेर 12 शो रुम उघडले आहेत. या दिवाळीच्या अगोदर कंपनी 20 नवीन शोरुम उघडण्याच्या तयारीत आहे. कंपनीने संपूर्ण वर्षभरात 52 नवीन स्टोअर उघडली आहेत. कंपनीचा महसूल आणि नफा वाढत असल्याने कंपनीने व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना आखली आहे.

टायटनचा शेअर पण उच्चांकावर पहिल्या तिमाहीत टायटनचा शेअर पण वधारला आहे. हा शेअर जवळपास 3.5% टक्के तेजीत आहे. शेअर 3,210 रुपयांच्या नवीन उच्चांकावर आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसूलात 20% ची वाढ झाली आहे. व्यवसायात 10 टक्क्यांहून अधिकची वाढ दिसत आहे.

इतके शोरुम उघडले या तिमाहीत कंपनीने एकूण 68 नवीन स्टोअर उघडले आहेत. त्यामुळे कंपनीच्या एकूण रिटेल स्टोअर्सची संख्या 2,778 वर पोहचली आहे. या कंपनीच्या ज्वेलरी सेक्शनमध्ये दरवर्षी 21 टक्के वृद्धी दिसून येत आहे. तर वर्षाच्या आधारावर विक्रीत 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ दिसून येत आहे. ज्‍वेलरी कंपनी Thangamayil Jewellery चा शेअर शुक्रवारी 6 टक्क्यांनी उसळला. हा शेअर काल व्यापारी सत्रात 1638.45 रुपयांवर बंद झाला.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.