GOLD PRICE : सोन्याची चमक फिक्की, चालू आठवड्यात 1 हजार रुपयांची घसरण; गुंतवणूकदार अस्थिर

शेअर बाजार अस्थिरतेच्या काळात गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे होता. कोविड प्रकोपाच्या काळात सोन्याचा भाव उच्चांकी स्तरावर पोहोचला होता.

GOLD PRICE :  सोन्याची चमक फिक्की, चालू आठवड्यात 1 हजार रुपयांची घसरण; गुंतवणूकदार अस्थिर
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 1:18 PM

नवी दिल्ली– गेला आठवडा गुंतवणुकदारांसाठी अस्थिरतेचा ठरला. शेअर बाजारातील पाचही दिवस घसरणीचे ठरले. केवळ शेअर बाजाराच (SHARE MARKET UPDATE) नव्हे तर सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने गुंतवणुकदारांना कोट्यावधी रुपयांवर पाणी फेरावं लागलं. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपासून 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण होत आहे. गेल्या आठवड्यात 9-13 मे दरम्यान सोन्याच्या भावात (GOLD INVESTMENT) तब्बल 1,014 रुपयांची घसरण नोंदविली गेली. शेअर बाजार अस्थिरतेच्या काळात गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे होता. कोविड प्रकोपाच्या काळात सोन्याचा भाव उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. आजवरचा सर्वाधिक भावाचा उच्चांक सोन्यानं गाठला होता. कोविड लसीकरणानंतर (COVID VACCINATION) समाजजीवन पूर्वपदावर आल्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा पूर्वपदावर आले होते. दरम्यान, गेल्या काळात सोन्याचे भावात पुन्हा स्थिरता-अस्थिरतेचं चित्र निर्माण झालं आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार

गेल्या आठवड्यातील सोन्याचे भाव खालीलप्रमाणे-

हे सुद्धा वाचा

· 9 मे – 51,479

· 10 मे – 51,496

· 11 मे – 51,205

· 12 मे – 51,118

· 13 मे – 50465

..घसरणीचे पाच दिवस

शेअर बाजारात सलग पाच दिवसांच्या घसरणीचा परिणामुळे शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 241.34 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात आठवड्याच्या अखरेच्या दिवशी मार्केट कॅप 255.17 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर होता. एका आठवड्यात गुंतवणुकदारांना एकूण 13.83 लाख कोटींवर पाणी सोडावं लागलं आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 2042 अंक (3.72%) घसरण नोंदविली गेली. तर निफ्टी 629 अंक (3.83%) टक्क्यांची घसरण झाली. पाच दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स 53 हजार आणि निफ्टी 15800 स्तराच्या खाली पोहोचला. चालू मे महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीत 7-7 टक्क्यांची घसरण झाली आहे.

गोल्ड ते शेअर: मार्केट अस्थिरतेची कारणं-

· वाढती महागाई- भारतासह जगभरात महागाईचा आलेख उंचावला

· वाढत्या महागाईचं सावटं गुंतवणुकदारांमध्ये

· फेडरल रिझर्व्हचे व्याजदरात वाढीचं संकेत

· परकीय गुंतवणुकदारांनी शेअर बाजारातून पैशाचा बहिर्गत ओघ

· चीनमध्ये कोविडच वाढतं सावट

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.