ऐकलंत ना, सोने स्वस्त झालंय ते, 15 दिवसांत सोने इतके झाले स्वस्त, यापूर्वी होता 51,455 रुपयांचा भाव
सोने स्वस्त झालंय बरं का. 24 कॅरेट सोन्याचे भाव मे महिन्यात 51,125 रुपये होते. तर जून महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर घसरले आणि सोने स्वस्त झाले. 10 ग्रॅम सोन्याचे भाव 50,606 रुपये झाले. गुंतवणुकीसाठी सध्या सोने हा चांगला पर्याय ठरु शकतो.
शेअर बाजारात(Share Market) घसरणीचे सत्र थांबता थांबत नाहीये. गुंतवणुकदार (Investor) सध्या देव पाण्यात ठेऊन बसले आहे. गेल्या काही दिवसातील हाद-यांनी त्यांना घाम फोडला आहे. सततच्या चढउतारामुळे गुंतवणुकदारांना बाजाराचा भरवसा येत नसल्याचे चित्र आहे आणि गुंतवणुकदार गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. अशावेळी सोन्याच्या (24 carat Gold) गेल्या 15 दिवसांतील भावांनी यातील गुंतवणूक स्वस्त केली आहे. 24 कॅरेट सोन्याचे भाव मे महिन्याच्या अखेरीला 51,125 रुपये होते. तर जून महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर घसरले आणि सोने स्वस्त झाले. 10 ग्रॅम सोन्याचे भाव 50,606 रुपये झाले. एका दिवसानंतर सोन्यातील हा बदल सकारात्मक ठरला. गेल्या 15 दिवसांपासून सोन्याचे भाव कमी होत आहे. आता तर सोने 50 हजारांच्या आताबाहेर खेळत आहे. परिणामी गुंतवणुकीसाठी सध्या सोने हा चांगला पर्याय ठरु शकतो.
या 15 दिवसांत भावात चढउतार
सोन्याचे भाव 1 जून पासून सातत्याने कमी जास्त होत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचे भाव 51,125 रुपये होते. तर मे महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर 50,606 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. हा बदल गुंतवणुकदारांसाठी फायदेशीर ठरला. भावातील बदल गुंतवणुकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरला.
पुन्हा सोने चकाकले
दरम्यान 3 जून 2022 रोजी सोन्याचे भाव पुन्हा चकाकले. 10 ग्रॅम सोन्याचे दर पुन्हा झळाळले. 3 जून रोजी सोन्याचे दर दहा ग्रॅमसाठी 51,455 रुपयांवर पोहचले. केवळ 3 जून रोजीच सोन्याचे दर कडाडले. पण त्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा पडले. सोन्याचे भाव 14 जून रोजी पडून 50,647 रुपयांवर येऊन पडले. म्हणजे एकाच दिवसात सोन्याचे दर 212 रुपयांनी कमी झाले. तर जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विचार करता सोन्याच्या दरात एकूण 41 रुपयांची वाढ झाली आहे.
गुंतवणुकीसाठी पारंपारिक पर्याय
भारतीयांच सोन्यावरील प्रेम जगजाहीर आहे. चीन खालोखाल भारतात सोन्याची खरेदी करण्यात येते. जर तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करु इच्छिता तर सोन्यासारखा सोने हाच पर्याय आहे. सोन्यातील गुंतवणूक ही परंपरागत असून भारतीय लोक सोन्यात सर्वाधिक गुंतवणूक करतात.
मिस्ड कॉल द्या, भाव जाणून घ्या
ibja या संकेतस्थळावरील माहितीनुसार, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांव्यतिरिक्त शनिवारी आणि रविवारी भाव जाहीर करण्यात येत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे किरकोळ भाव जाणून घ्यायचे असतील तर 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देता येईल. काही वेळातच एसएमएसद्वारे ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर भाव मिळतील.
सोन्याच्या शुद्धतेचा हॉलमार्क
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते 21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते 14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते