Gold Price : लग्न सराईत गोल्डन जंप, सोने खरेदी महागली, तोडले सर्व रेकॉर्ड.. आजचा भाव काय?

Gold Price : सोने खरेदीसाठी आता तुम्हाला अधिकची रक्कम मोजावी लागेल.

Gold Price : लग्न सराईत गोल्डन जंप, सोने खरेदी महागली, तोडले सर्व रेकॉर्ड.. आजचा भाव काय?
सोन्याने तोडले रेकॉर्डImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 7:35 PM

नवी दिल्ली : सोन्याने पुन्हा एकदा मरगळ झटकली आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशातंर्गत सोन्याचा दरात (Gold Price) मोठी वृ्द्धी झाली आहे. डॉलरचे (Dollar) पानीपत झाल्याने सोन्याला चकाकी आली आहे. सोबतच चांदीलाही (Silver Rate) लकाकी आली आहे. ऐन लग्न सराईच्या तोंडावर सोन्याचे दर वाढल्याने सर्वांचेच तोंडचे पाणी पळाले आहे.

घरगुती बाजारात तर सोन्याचे दर आता झरझर वाढले आहेत. त्यामुळे ऐन लग्न सराईत वधू-वर पक्ष चिंतेत आला आहे. पण हौसेला मोल नसते म्हणतात. सोन्याचा दर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बाजारात सोन्याचा भाव 52,000 रुपयांवर पोहचला आहे.

MCX वर Gold Future ने शुक्रवारी 202 रुपये वा 0.39% ची वृद्धी नोंदवली. त्यामुळे सोन्याचे घोडे 52,311 रुपयांच्या पुढे दामटल्या गेले. तर Silver Future 292 रुपये वा 0.47% वर पोहचला. चांदीचा भाव प्रति किलो 61,619 रुपयांवर पोहचला.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात जबरदस्त वृद्धी दिसून आली. US Gold मध्ये काल 20.50 डॉलर वा 1.17% वृद्धी दिसून आली. भाव 1,774.20 डॉलरवर पोहचला होता. तर US Silver 0.035 डॉलर वा 0.16% च्या घसरणीसह 21.667 डॉलर प्रति औसवर बंद झाली.

वायदे बाजारात ही सोन्याची चमक कायम होती. त्यात उलट मागील काही दिवसांपेक्षा वृद्धी दिसून आली. सोन्याचे भाव वायदे बाजारात 373 रुपयांनी वाढले. सोन्याचा दर आज 52,482 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

Multi commodity Exchange मध्ये सोने डिसेंबरच्या आघाडीवर 373 रुपये वा 0.72 टक्के वृद्धीने आघाडीवर होते. सोन्याचा भाव 52,482 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होता.

24 कॅरेट सोन्याचा दर आज प्रति ग्रॅम 5,228 रुपये होता. तर 22 कॅरेट सोने 5,103 रुपये, 20 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 4,553 रुपये होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 4,235 रुपये प्रति ग्रॅम होता. 14 कॅरेट एक ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना आज 3,372 रुपये मोजावे लागले. तर एक किलो शुद्ध चांदीचा भाव 61,354 रुपये होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.