Gold Rate today : सोने आज स्वस्त झाले की महाग, काय आहे आजचा सोन्याचा भाव? आठवडाभरात किती रुपयांची झाली घसरण
Gold Rate News : सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने चढ उतार होत असला तर आठवडाभरात सोन्याच्या किंमतीत फार मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) डॉलरकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे. त्यातच डॉलर इंडेक्स मध्ये ही मोठी तेजी आल्याने सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 10 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचल्या आहेत. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या भावात 2.20 टक्क्यांची घसरण झाली आणि भाव 50, 810 रुपयांवर स्थिरावले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 1,742 डॉलर प्रती औसवर बंद झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात या किंमती 1,780 डॉलरवर बंद झाल्या होत्या. आज, 9 जुलै रोजी 10 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate)सध्या भारतीय बाजारात 51,110 रुपये आहे. काल हीच किंमत होती. आज एक किलो चांदीची किंमत (Silver Price) 57,000 रुपये आहे, जी कालच्या खरेदी किंमतीइतकीच आहे. या वर्षाच्या 5 ऑगस्ट रोजीच्या वायदे बाजारीतील यादीनुसार सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 0.37 टक्क्यांनी वाढून 50,180.00 रुपये झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि उत्पादन शुल्क यासह विविध घटकांचा सोन्याच्या किमतीवर दररोज परिणाम होतो.
राज्यातील चार प्रमुख शहरांमधील शनिवारीचे सोन्याचे भाव
गुड रिटर्न्स संकेतस्थळानुसार (Good Returns website), 10 ग्रॅम 22-कॅरेट सोने मुंबईत 46,850 रुपये दराने विक्री केल्या जात आहे. तर सध्याच्या किमतींनुसार 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत मुंबईत 51,110 रुपये आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव सध्या पुण्यात 46,870 रुपये आणि 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत 51,140 रुपये आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत सध्या नाशिक 46,870 रुपये आहे तर 24-कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 51,140 रुपये आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत सध्या नागपूर शहरात 46,970 रुपये आहे तर 24-कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 51,240 रुपये आहे.
वायदे बाजारात काय आहे स्थिती
सर्वात अलीकडील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) यादीनुसार, या वर्षाच्या 5 ऑगस्ट रोजीच्या वायदे बाजारीतील यादीनुसार सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 0.37 टक्क्यांनी वाढून 50,180.00 रुपये झाली आहे. 5 सप्टेंबरचा चांदीचा वायदा करार 0.37 टक्क्यांनी वाढून 57,148.00 रुपयांवर बंद झाला.
दोन हजारांनी भावात घसरण
भारतात सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यात तब्बल दोन हजारांची घसरण पहायला मिळाली. सराफांनी घरगुती बाजारात सोने 28 डॉलर प्रति औसपर्यंत सवलतीत विक्री केले. रॉयटर्स या आघाडीच्या वृत्तसंस्थेने सोन्याच्या किंमतीत 40 डॉलरची सवलत मिळाल्याचे सांगितले. भारतातील सोन्याच्या किंमतीत 3 टक्के वस्तू आणि सेवा कर(GST) आणि 15 टक्के आयात शुल्क (Import Duty) यांचा ही समावेश होतो. परिणामी भारतात सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅमसाठी 52,300 रुपये मोजावे लागत होते. आता शुक्रवारी हा भाव 50,650 रुपयांच्या घरात आला होता.