Gold Price Today : चांदी 68 हजारच्या पार, तर सोनंही महागलं! जाणून घ्या आजचा दर

Gold rate today : 24 कॅरेट (24 Carat Gold) सोन्याचा दर 52 हजार तीनशे रुपयांच्या पार गेला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 640 रुपयांची भाववाढ नोंदवम्यात आली आहे.

Gold Price Today : चांदी 68 हजारच्या पार, तर सोनंही महागलं! जाणून घ्या आजचा दर
10 ग्रॅम सोन्यासाठी एवढा रिकामा होईल खिसा Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 7:53 PM

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात (Gold & Silver Rates Today) आज पुन्हा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत आज 600 रुपयांची भाववाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर हा जवळपास 48 हजार झाला आहे. 24 कॅरेट (24 Carat Gold) सोन्याचा दर 52 हजार तीनशे रुपयांच्या पार गेला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 640 रुपयांची भाववाढ नोंदवम्यात आली आहे. एकीकडे 54 हजारापर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर हे आता 52 हजारांपर्यंत खाली उतरले असले तरिही आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरांचा आलेख हा पुन्हा चढत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून आलं आहे. गुडरीटर्न्सनं दिलेल्या माहितीनुसार बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोनं महागलंय. 22 आणि 24 या दोन्ही कॅरेट सोन्याच्या प्रकरात भाववाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत सोनं जवळपास हजार रुपयांनी महागलं आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही (Gold Silver price increased) तेजी पाहायला मिळाली आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील सोन्याचा दर

  1. मुंबई 22 कॅरेट – 47 हजार 950 24 कॅरेट – 52 हजार 310
  2. नाशिक 22 कॅरेट – 48 हजार 50 24 कॅरेट – 52 हजार 350
  3. पुणे 22 कॅरेट – 48 हजार 50 24 कॅरेट – 52 हजार 350
  4. नागपूर 22 कॅरेट – 48 हजार 20 24 कॅरेट – 52 हजार 330

एकीकडे सोन्याचे दर वाढत असतानाच आता चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जवळपास हजार रुपयांची वाढ रुपयांची वाढ चांदीच्या दरात नोंदवण्यात आली आहे. एक किलो चांदीचे दर 68 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. 900 रुपयांची वाढ चांदीच्या दरात नोंदवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या शहरांमध्ये नेमकं चांदीचे दर किती?

  1. मुंबई 68,500
  2. पुणे 68,500
  3. नाशिक 68,500
  4. नागपूर 68,500

एकीकडे इंधनाच्या दरवाढीनं देशात पुन्हा डोकं वर काढलेलं आहे. राज्यभरात वाढत्या इंधन दरवाढीविरोधात रोष पाहायला मिळतोय. अशातच इंधन दरवाढीसोबतच आता सोन्या चांदीचे दरही पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईची झळ सगळ्यांना बसू लागली आहे.

शेअर बाजारातील घसरणीचं सत्रही गुरुवारी सुरुच असल्याचं पाहायला मिळालं आहे. गुरुवारी सेन्सेक्समध्ये 89 अंकांची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टीमध्ये 22 अंकांची घट झाली आहे. सेनेक्स सध्या 57 हजार 595.68 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 17 हजार 222.75 वर बाजार बंद होताना स्थिरावला आहे. आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाल्यानं गुंतवणूकदारही धास्तावल्याचं पाहायला मिळालंय.

शेअर बाजाराचे 4 मोठे मुद्दे

  1. 1 हजार 426 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ
  2. 1 हजार 888 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
  3. 100 कंपन्यांचे शेअर्स स्थिर
  4. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये अल्पशी वाढ

संबंधित बातम्या :

PayTM घसरण थांबेना! शेअर्स 520 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर, गुंतवणूकदारांना शॉक

RUCHI SOYA : गुंतवणुकदारांनो दाखवा ‘रुची’; कर्ज फेडीसाठी बाबा रामदेवांचा ‘एफपीओ’!

‘या’ बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये कमाईच्या संधी, शेअरमध्ये 35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.