Gold Price Today: सोन्याचा भाव पुन्हा वधारला, जाणून घ्या सोने-चांदीचा आजचा दर

Gold price | सध्या सोने सप्टेंबर महिन्यातील जवळपास निचांकी पातळीवर आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते.

Gold Price Today: सोन्याचा भाव पुन्हा वधारला, जाणून घ्या सोने-चांदीचा आजचा दर
सोन्याचे दर 48 हजारांच्या खाली
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 12:16 PM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा किंमतीत सातत्याने घसरण सुरु आहे. त्यामुळे सोन्याचा भाव सात आठवड्यांतील निचांकी स्तरावर पोहोचला आहे. मात्र, बुधवारी सोन्याच्या भावात किंचीत तेजी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 0.19 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा दर 45,910 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात 0.14 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे एका किलो चांदीसाठी आज 60,551 रुपये मोजावे लागत आहेत.

सोने उच्चांकी पातळीपेक्षा 11 हजार रुपयांनी स्वस्त

गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याने प्रतितोळा 56200 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. या तुलनेत सोने सध्या 11000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे.

सोने खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

सध्या सोने सप्टेंबर महिन्यातील जवळपास निचांकी पातळीवर आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

PHOTO | गोल्ड स्पॉट एक्सचेंज म्हणजे काय! सेबीने मंजूर केलेल्या, सामान्य लोकांना मिळेल थेट लाभ

पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?

आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

PHOTO | गोल्ड स्पॉट एक्सचेंज म्हणजे काय! सेबीने मंजूर केलेल्या, सामान्य लोकांना मिळेल थेट लाभ

आरं सोन्यालाही लागली कळsss सराफा बाजार आज आणखी कोसळला, वाचा औरंगाबादचे भाव

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.