Gold Silver Rates : बजेटपूर्वी सोन्याच्या किंमती भडकल्या, चांदीही वधारली, काय आहे आजचा भाव?

Gold Silver Rates : बजेटपूर्वी सोन्या-चांदीच्या किंमती भडकल्या आहेत, काय आहेत आजचा भाव

Gold Silver Rates : बजेटपूर्वी सोन्याच्या किंमती भडकल्या, चांदीही वधारली, काय आहे आजचा भाव?
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 4:30 PM

नवी दिल्ली :  भारतीय सराफा बाजारात  आज, 30 जानेवारी 2023 रोजी सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price) भडकल्या. बजेटपूर्वीच (Union Budget 2023) किंमती वधारल्याने खरेदीदारांच्या तोंडचे पाणी पळाले तर गुंतवणूकदारांचा फायदा झाला. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. तर चांदीचा भाव प्रति किलो 68 हजारांच्या पुढे गेला आहे. 999 शुद्ध 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,288 रुपये आहे. तर 999 शुद्ध एक किलो चांदीचा भाव 68,334 हजार रुपये आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) नुसार, शुक्रवारी संध्याकाळी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,189 रुपये होती. सोमवारी हा भाव 57,288 रुपये झाला.

24 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 57,322 रुपये प्रति 10 असा उच्चांकी होता. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपयांचा रेकॉर्ड तयार केला होता. म्हणजे दोन वर्षांत सोने 1000 रुपयांनी वधारले आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काळात सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचेल. तर चांदीचा भाव 80 हजार रुपयांच्या पुढे जाईल.

ibjarates.com या अधिकृत संकेतस्थळानुसार, आज सकाळी 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव वधारला. हा दर 57,059 रुपयांवर पोहचला. तर 916 शुद्ध सोने आज 52,476 रुपयांवर पोहचले. शुद्ध सोन्यात भाव वाढ दिसून आली तर चांदीची किंमत वधारली.

हे सुद्धा वाचा

750 शुद्ध सोन्याचे दर 42,966 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचले. 585 शुद्ध सोन्याच्या भावात वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 33,514 रुपयांवर पोहचली. तर 999 शुद्ध एक किलो चांदीची किंमत 68,334 रुपये होती. चांदीच्या किंमतीत मोठी वृद्धी होण्याचा अंदाज आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.

अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते.

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येईल.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.