Today Gold Rate : सूसाट सोन्याला ब्रेक, मग गुंतवणूक ठरणार फायद्याची? तज्ज्ञांचा सल्ला काय
Today Gold Rate : दोन दिवसांपूर्वी सोन्याने कमाल केली. यापूर्वीचा उच्चांक मोडला. पण सोन्याने पुन्ही रिव्हर्स गिअर टाकल्याने गुंतवणूकदार साशंक झाले आहेत, सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरणार का?
नवी दिल्ली : सोन्याने (Gold Price Today) पुन्हा नवीन उच्चांक गाठला. पण सोने या उच्चांकावर टिकले नाही. सोन्याने लागलीच रिव्हर्स गिअर टाकला. सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. अर्थात गुंतवणूकदारांना (Investors) सोन्यात गुंतवणुकीची संधी मिळाली. पण घसरण सुरु राहिल की सोने पुन्हा वधारेल, याविषयी गुंतवणूकदार साशंक आहेत. सोन्याच्या उसळी आणि झपाट्याने खाली येण्यामागे काही कारणं आहेत. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) बँकेचे धोरण, युरोपियन देशातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वृद्धी विषयी घेतलेले लवचिक धोरण, डॉलरचा भाव गेल्या 10 महिन्यात नीच्चांकी स्तरावर आल्याने सोन्याने एकदम उसळी तर घेतली पण ते झपाट्याने खाली आले.
आज भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव 58,847 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर वायदे बाजारात (MCX) एप्रिल 2023 साठी सोन्याचा फ्युचर कॉन्ट्रक्ट 56,560 प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. यापूर्वीच्या उच्चांकी पातळीपेक्षा हा भाव जवळपास 2,300 रुपयांनी कमी आहे.
वायदे बाजारातील तज्ज्ञानुसार, युएस फेड आणि युरोपातील केंद्रीय बँकांनी व्याज दरात लवचिक धोरण यामुळे डॉलरवर परिणाम झाला. अमेरिकन डॉलरचे दर 10 महिन्यांतील नीच्चांकी स्तरावर पोहचले. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींना $1,860 स्तरावर चांगले समर्थन मिळत आहे. तर घरगुती बाजारात सोन्याला 56,500 रुपये स्तरावर चांगले समर्थन मिळाले आहे. भावात वाढ होऊन ते 57,700 रुपयांपर्यंत उसळी घेऊ शकते.
भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.
अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते.
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.
- 30 जानेवारी रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,079 रुपये
- 31 जानेवारी रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,865 रुपये
- 01 फेब्रुवारी रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,910 रुपये
- 02 फेब्रुवारी रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,882 रुपये
- 03 फेब्रुवारी रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,788 रुपये