Gold Price : आठवड्याभरात सोन्याच्या भावात मोठी घट, चांदीची चमकही घटली

मार्चमध्ये लग्नांची धामधूम नाही. याचा परिणाम गेल्या आठवड्यात सोने, चांदीच्या किमतींवर पाहायला मिळाला. IBJA कडून प्रकाशित आकड्यानुसार गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात 1 हजार 100 रुपये प्रती दहा ग्राममध्ये घट दिसली.

Gold Price : आठवड्याभरात सोन्याच्या भावात मोठी घट, चांदीची चमकही घटली
सोन्या-चांदीचे भावImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 3:31 PM

नागपूर : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोने, चांदीच्या भावात घट दिसली. उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. याचा परिणाम म्हणून शेअर बाजारातून (Stock market) रिकव्हरी होणार नाही. शिवाय मार्चमध्ये लग्नांचा धुमधडाका नाही. म्हणून 7 मार्च ते 11 मार्चदरम्यान सोन्या, चांदीच्या भावात (gold, silver prices) घसरण झाली. मार्चमध्ये लग्नांची (wedding in March) धामधूम नाही. याचा परिणाम गेल्या आठवड्यात सोने, चांदीच्या किमतींवर पाहायला मिळाला. IBJA कडून प्रकाशित आकड्यानुसार, गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात 1 हजार 100 रुपये प्रती दहा ग्राममध्ये घट दिसली. हे आकडे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर आधारित आहेत.

आठवड्याभरातील सोन्याचे भाव

7 मार्च : 24 कॅरेट सोन्याची किंमत 53,595 रुपये प्रती 10 ग्राम होती. 8 मार्च : मंगळवारी सोन्याच्या भावात 47 रुपयांची घट झाली. 53,548 रुपये प्रती 10 ग्राम होते. 9 मार्च : बुधवारी सोन्याचा भाव 407 रुपये कमी झाला. बुधवारी सोनेबाजार बंद होण्याच्या वेली 24 कॅरेट सोन्याचे भाव 53,141 रुपये प्रती 10 ग्राम होता. 10 मार्चला : गुरुवारी निवडणुकीचे निकाल घोषित झाले. या दिवशी 10 ग्राम सोन्याच्या भावात 261 रुपयांची घसरण झाली. 10 मार्चला सोन्याचे भाव 52,880 रुपये प्रती 10 ग्राम होते. 11 मार्च : आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या भावात 418 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. 52,462 रुपये प्रती 10 ग्रामवर भाव होते.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आकड्यांनुसार 7 – 11 मार्च या आठवड्यात सोने 1,133 रुपये प्रती ग्राम स्वस्त झाले.

चांदीच्या किमतीतही घसरण

7 मार्च : सोमवारी सोनेबाजारात चांदीची किंमत 70,580 रुपये प्रती किलोग्राम होती. 8 मार्च : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी चांदीच्या किमतीत 310 रुपये किलोग्राम वाढ पाहायला मिळाली. 9 मार्च : आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी 56 रुपये प्रती किलोग्राम चांदीच्या भावात घसरण झाली. यामुळं बाजारात चांदीची किंमत 70,834 रुपये प्रतीकिलो झाली. 10 मार्च : गुरुवारी चांदीच्या किंमत 1,019 रुपये कमी होऊन 69,815 रुपये प्रती किलोग्रामवर आली. 11 मार्च : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांदीची किंमत 102 रुपये प्रती किलोग्राम घसरली. बाजारात चांदीची किंमत 69,713 रुपये प्रती किलोग्राम होती.

अशाप्रकारे आठवडी बाजारात चांदीची किंमत 867 रुपये प्रती किलोग्राम घसरली. हे आकडे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर आधारित आहेत.

आंदोलन करून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न, माणिकराव ठाकरे यांची भाजपवर टीका

मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण केव्हापर्यंत, सुनील केदारांनी सांगितली तारीख

Photo – अकोल्यात ती आली, तिने जिंकले…, पण वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले कसे ते पाहा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.