Today’s gold, silver prices: सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

सोन्याच्या (Gold) दरात आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दहा ग्रॅम अर्थात प्रति तोळा 22 कॅरट सोन्याची किंमत आज 48 हजार 100 रुपये इतकी झाली आहे.

Today’s gold, silver prices: सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
सोन्याच्या दरात वाढ
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 8:58 AM

मुंबई : सोन्याच्या (Gold) दरात आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दहा ग्रॅम अर्थात प्रति तोळा 22 कॅरट सोन्याची किंमत आज 48 हजार 100 रुपये इतकी झाली आहे. तर शुक्रवारी 22 कॅरट सोन्याची किंमत 47,650 इतकी होती. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरामध्ये कालच्या तुलनेत 450 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीचा (silver) आजचा दर 68 हजार 807 रुपये प्रति किलो एवढा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती चांगल्याच कडाडल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यामध्ये घसरण पहायला मिळाली. आज गुढीपाडव्यामुळे सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,100 इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,470 इतका आहे. पुण्यात आज 22 कॅरट सोन्याचा भाव 48,180 इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52,550 इतकी आहे. नागपूरमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा प्रति तोळा दर अनुक्रमे 48,180 आणि 52,550 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 68 हजार 807 रुपये एवढा आहे. चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे.

सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ

रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. युद्धामुळे कच्च्या तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सोन्यासारख्या मौल्यवान धातुच्या किमती देखील वाढल्या आहेत. दरम्यान येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या सोन्यातील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

इंधन दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवणार; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे स्पष्टीकरण

Emergency in SriLanka: श्रीलंकेत नागरिक रस्त्यावर, आंदोलनाला हिंसक वळण; सरकारकडून आणीबाणीची घोषणा

Petrol,Diesel Price Hike : इंधनाच्या किमतीमध्ये आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील दर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.