AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : 2300 रुपयांनी सोने झाले स्वस्त, खरेदीची ही आहे का योग्य वेळ?

Gold Rate Today : वायदे बाजारात गुरुवारीच्या बाजार बंद होताना जो भाव होता, त्यापेक्षा आज सोन्याच्या भावात घसण झाली. तर आज 56,496 रुपये प्रति 10 ग्रॅम, अशी घसरणीने सुरुवात झाली. सोन्याने 7 दिवसांपूर्वी सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर आता त्यात 2,300 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण झाली.

Gold Rate Today : 2300 रुपयांनी सोने झाले स्वस्त, खरेदीची ही आहे का योग्य वेळ?
काय करावी गुंतवणूक?
| Updated on: Feb 10, 2023 | 4:42 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात सोन्याने उच्चांकी गिरकी घेतली होती. पण शुक्रवारी सोन्याचे भाव घसरले. वायदे बाजारात (Multi Commodity Exchange-MCX) गुरुवारच्या बंद भावापेक्षा आज सोन्यात घसरण दिसून आली. आज भाव 56,496 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका घसरला. 7 दिवसांपूर्वी सोन्याने उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा सोन्याने आपटी खाल्ली. सोन्याचा भाव (Gold Price Today) 2,300 रुपये प्रति 10 ग्रॅम नीच्चांकी आला. तर चांदीच्या भावानेही (Silver Price Today) नीच्चांक नोंदवला. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा आज चांदीने मोठी आपटी खाल्ली. चांदी 6,500 रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे या आठवड्यात गुंतवणूकदारांना लॉटरी लागली आहे. त्यांना गुंतवणुकीसाठी मोठी संधी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोने आता 60,000 रुपयेच नाही तर 62 हजारांपर्यंत धडक देऊ शकते. तर चांदी 80 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. पण यापेक्षा ही भाव कमी होणार का? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 1,855 डॉलर प्रति औसवर व्यापार करत आहे. चांदी 22 डॉलर प्रति औसवर घसरली आहे. डॉलर निर्देशांकात सावरला. तर अमेरिकन केंद्रीय बँकेच्या तिजोरीत गंगाजळी आल्याने सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांकावरुन खाली घसरल्या आहेत. या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

सोन्याच्या घसरणीवर आयआयएफएल सिक्युरिटीज संशोधना विभागाचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी मत मांडले. त्यानुसार, येत्या काही दिवसांत सोन्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदीदारांना आणि गुंतवणूकदारांनी सोन्यात सध्या गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

इंडियन बुलियन आणि ज्वैलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association-IBJA ) नुसार, आज सराफा बाजारात सोन्याचा भाव 57,538 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 67,516 रुपये प्रति किलो आहे.

सोन्याच्या किंमती तुम्ही घरात बसूनही चेक करु शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्हाला भाव चेक करता येईल. ज्या क्रमांकावरुन तुम्ही मॅसेज पाठवाल त्यावर किंमतींचा संदेश येईल.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.