Gold Silver Rate Today : लग्नसराईत सोन्याचा भाव वधारला, काय आहे आजचा भाव
Gold Silver Rate Today : लग्नसराईमध्ये सोन्याने बार उडवून दिला. चांदीचा भावही वधारला आहे.
नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी सोने -चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price) सातत्याने घसरण होत होती. पण लग्नसराईत सोन्याचे भाव पुन्हा वधारले. वायदे बाजारात (MCX) सोने विक्रमीस्तरावर पोहचले आहे. तर चांदीच्या भावात अजूनही घसरण सुरुच आहे. आर्थिक मंदीची भीती, कोरोनाचा कहर, डॉलर निर्देशांक, रशिया-युक्रेन युद्ध या सर्वांचा बाजारावर परिणाम झाला. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात अजून वाढ झालेली नाही.
तुम्ही आज सोने वा चांदी खरेदीची योजना आखत असला तर नवीन भाव माहिती करुन घ्या. कारण चांदी आज स्वस्त मिळू शकते. तर सोन्यासाठी खिसा खाली करावा लागू शकतो. सोन्याचा भाव जास्त असून चांदी आज स्वस्त मिळत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारीसाठी ट्रेड करणाऱ्या सोन्याचा भाव 154 रुपयांनी वधारला. यामध्ये 0.27 टक्क्यांची थोडी वाढ झाली. हा भाव 56,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोने फेब्रुवारीसाठी 154 रुपयांनी महागले. या आठवड्यात सोन्याने सर्वकालीन 56500 रुपये विक्रम केला आहे.
चांदीच्या दरात घसरण सुरुच आहे. 3 मार्च, 2023 साठी चांदीचा वायदे बाजारातील भाव 142 रुपये वा 0.21 टक्के घसरणीसह नोंदवला गेला. हा भाव 68,085 रुपये प्रति किलो आहे. एका आठवड्यात चांदीच्या दराने 70 हजार रुपये प्रति किलोचा भाव गाठला. आज जर चांदीची खरेदी केली तर तुम्हाला 226 रुपये स्वस्त मिळेल.
नवीन दिल्लीत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,150 रुपये, तर चांदीची किंमत 71,900 रुपये आहे. मुंबईत सोन्याची किंमत 52,000 रुपये आणि चांदी 71,900 रुपये प्रति किलो विक्री होत आहे. कोलकत्यात सोने 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 72,200 रुपये प्रति किलो विक्री करण्यात येत आहे.
चेन्नईत सोन्याची किंमत 52,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 73,500 रुपये प्रति किलो विक्री झाली. 18 जानेवारी रोजी बाजार बंद होताना सोने आणि चांदीच्या किंमती क्रमशः 56,286 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 68,227 रुपये प्रति किलो आहे.