Gold Silver Rate Today : सोन्याला उसळी, चांदी घसरली, सराफा बाजारात तोबा गर्दी

Gold Silver Rate Today : सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे. या महिन्यात तर सोन्याने दरवाढीची वर्दी दिली आहे. चांदीने मात्र माघार घेतली आहे. अमेरिकेतील घडामोडींचा मोठा परिणाम दिसून येत आहे.

Gold Silver Rate Today : सोन्याला उसळी, चांदी घसरली, सराफा बाजारात तोबा गर्दी
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 9:16 AM

नवी दिल्ली : सोने दरवाढीची शिडी झरझर चढत आहे. तर चांदीने मात्र माघार घेतली आहे. या महिन्यात सोन्याने दरवाढीची सलामी दिली आहे. तर चांदीने मात्र अजून मोठी उसळी घेतलेली नाही. अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम दिसून येत आहे. दोन्ही धातू दबावाखाली होते. पण अमेरिकन महागाईचे आकडे समोर येत आहे. डॉलर कमजोर होण्याची चिन्हं दिसताच सोन्याने उडी घेतली. तर चांदी मात्र माघारी फिरली आहे. अमेरिकन डॉलर कमजोर झाला तर फटका बसू शकतो. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक (Federal Reserve Bank) या महिन्यात व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. 0.25 बेसिस पाँईटची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोने-चांदीचा (Gold Silver Price Today) काय मूड असेल हे समोर येईल.

तांब्याला मागणी सोने-चांदीची चर्चा होत असताना चीनच्या खेळीमुळे तांब्याला जोर चढला आहे. चीनने तांबे खरेदीची मोठी ऑर्डर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीन तांब्याची मोठी आयात करत आहे. स्पेस स्टेशन, कृत्रिम सूर्य, मंगळावरील मोहीम तसेच अनेक उद्योगांसाठी तांब्याची चीनने मोठी आयात केली होती. आता मागणीत पुन्हा वाढवली आहे.

800 रुपयांची दरवाढ सोन्याने जुलै महिन्यात चांगलीच आगेकूच केली. सोन्याच्या किंमतीत जवळपास 800 रुपयांची दरवाढ झाली. तर चांदीने एकदाच हजारांची झेप घेतली. मे आणि जून महिन्यात दोन्ही धातूंना नवीन विक्रम करता आला नाही. पण जुलै महिन्यात सोन्याने चांगलीच उसळी घेतली. तरीही सराफा बाजारात खरेदीदारांची गर्दी उसळली आहे.

हे सुद्धा वाचा

असे वाढले दर

  1. 8 जुलै रोजी सोने थेट 400 रुपयांनी वधारले
  2. 4 जुलै आणि 6 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची दरवाढ
  3. 1 जुलै रोजी सोन्यात 220 रुपयांची उसळी
  4. गुडरिटर्न्सनुसार, या महिन्यात 3, 7 आणि 10 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची घसरण
  5. आज सकाळी भाव अपडेट झाले नाहीत.
  6. काल 22 कॅरेट सोने 54,600 रुपये तर 24 कॅरेट सोने 59,560 रुपये प्रति 10 ग्रॅम

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

  1. 11 जुलै, 24 कॅरेट सोने 58,656 रुपयांहून 58,866 रुपयांवर पोहचले
  2. 23 कॅरेट 58,421 रुपयांहून, 58,630 रुपये झाले
  3. 22 कॅरेट सोने 53,729 रुपये होते. ते 53,921 रुपयांपर्यंत वधारले
  4. 18 कॅरेट 43992 रुपयांत वाढ झाली. हा भाव 44,150 रुपये झाला
  5. 14 कॅरेट सोने 34314 रुपयांहून 34,437 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
  6. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे
  7. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते.
  8. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.