Gold Silver Price Today : सोन्याच्या भावात जोरदार घसरण! सराफा बाजारात खरेदीदारांची झुंबड

Gold Silver Price Today : सोने-चांदीमुळे सौंदर्याल चार चाँद लागले. सराफा बाजारात गेल्या आठवड्यापासून खरेदीदारांची झुंबड उडाली आहे. भावात झालेली घसरण बाजाराच्या पथ्यावर पडली आहे.

Gold Silver Price Today : सोन्याच्या भावात जोरदार घसरण! सराफा बाजारात खरेदीदारांची झुंबड
मन गेले हरकून
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 9:00 AM

नवी दिल्ली : देशात दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price) सातत्याने वाढ दिसून आली. भावातील ही सूज इतकी होती की, त्यावर खरेदीदारांना कधी शंका आली नाही की, बाजारातील दिग्गज तज्ज्ञांनी या दरवाढीवर आवाज उठविला. काही दिवसांसाठी सोने-चांदी माघार घेत असली तरी भावाची भरारी अचंबित करणारी होती. पण त्याविरोधात ग्राहकांनी, खरेदीदारांनी, गुंतवणूकदारांनी, आर्थिक तज्ज्ञांनी कधीच आवाज उठविला नाही. केवळ चिंता आणि नाराजी व्यक्त केली. सध्या 15 दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूत घसरणीचे सत्र आहे. पण ही वादळापूर्वीची शांतता असल्याचा काहींचा अंदाज आहे. देशातील सराफा बाजारात (Sarafa Market) सोने 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली घसरले आहे. तर चांदी गडगडून 71,000 रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.

भाव आता सोमवारी इंडियन बुलियन ज्वैलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार आणि रविवारी सोने-चांदीचे भाव जाहीर करत नाही. तसेच केंद्र सरकारने घोषीत केलेल्या सुट्यांच्या दिवाशी, सणा-सुदीला भाव अपडेट करण्यात येत नाही. गुडरिटर्न्स पण सुट्यांच्या दिवशी उशीरा भावात अपडेट करते.

शुक्रवारी होता हा भाव IBJA नुसार, शुक्रवारी सोने 199 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 60275 रुपयांवर पोहचले. तर गुरुवारी सोने 172 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 60,474 रुपयांवर पोहचले होते. शुक्रवारी चांदी प्रति किलो 71,784 रुपये तर गुरुवारी हा भाव 71,496 रुपये प्रति किलो होता.

हे सुद्धा वाचा

डॉलरची बॅटिंग अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक धोरणांमुळे डॉलर पुन्हा मजबूत झाला आहे. तो सातत्याने उच्चांकी दिशेने सुसाट सुटला आहे. दोन महिन्यात डॉलरने जागतिक बाजारात पुन्हा पत उंचावली. डॉलर इंडेक्स दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचला आहे.

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,275 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,034 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,212 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,206 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

शुद्ध सोन्याचा हॉलमार्क भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

अशी तपासा शुद्धता

  1. हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासू शकता
  2. त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या
  3. सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल
  4. हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे
  5. 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते.
  6. 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते
  7. 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते
  8. 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.