Gold Silver Price Today : सोन्याने सूर बदलला की हो! स्वस्तात खरेदीची पुन्हा संधी, मिस्ड कॉलवर मिळवा भाव

Gold Silver Price Today : गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीने सूर बदलला आहे. भावात नरमाई सुरु असल्याने सराफा बाजाराकडे न फिरकणारं गिऱ्हाईक अचानक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत.

Gold Silver Price Today : सोन्याने सूर बदलला की हो! स्वस्तात खरेदीची पुन्हा संधी, मिस्ड कॉलवर मिळवा भाव
भावात काय बदल
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 9:12 AM

नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून सोन्याने सूर बदलला आहे. सोने-चांदीत (Gold Silver Price Today) घसरण सुरु आहे. काल संध्याकाळी ही भावात घसरण होती. गेल्या 19 मार्चपासून सोन्याचा नूर बदलला होता. सोन्याने अचानक उसळी घेत, नवीन रेकॉर्ड केला होता. 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले होते. त्यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीने सूर बदलला आहे. भावात नरमाई सुरु असल्याने सराफा बाजाराकडे (Sarafa Market) न फिरकणारं गिऱ्हाईक अचानक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. सोन्याचा हा मूड किती दिवस असा राहतो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

भावात घसरण

आज 29 मार्च रोजी, सकाळी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. गुडरिटर्ननुसार, 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 250 रुपयांची घसरण होऊन भाव 54,650 रुपयांवर पोहचला. तर 24 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 280 रुपयांची घसरण होऊन सकाळच्या सत्रात हा भाव 59,600 रुपये झाला. 18 मार्चपासून विचार करता सोन्यात प्रति तोळा आज जवळपास 800 रुपयांची घसरण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची विश्रांती

आतापर्यंत चांदीच्या किंमती सूसाट होत्या. एका किलोमागे चांदीत हजार रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात चांदीच्या किंमती 73,300 हजार रुपये प्रति किलो होत्या. 29 मार्च रोजी या किंमतीत 300 रुपयांची घसरण झाली. या किंमती 73,000 रुपये प्रति किलो झाल्या आहेत. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. अजून हा रेकॉर्ड मोडायचा आहे. त्यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी चांदी 73,300 रुपये किलो होती.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही

एका मिस्ड कॉलवर भाव

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.