Gold Silver Price Today: सोने चकाकले तर चांदीची चमक फिक्की, काय आहे आजचे दर?

Gold Silver price: आज सोन्याचा भाव वाढला तर चांदीच्या चमक थोडी फिक्की पडली. 999 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचे दर महाग झाले.  सोन्याचा दर आज 5०,877 रुपये आहे. तर 999 शुद्ध एक किलो चांदीचा भाव 56,626 रुपये आहे.

Gold Silver Price Today: सोने चकाकले तर चांदीची चमक फिक्की, काय आहे आजचे दर?
आजचे सोन्या चांदीचे दरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 2:57 PM

आठवड्याच्या शेवटच्या सत्रात भारतीय सराफा बाजाराने (Sarafa Market) सोन्या चांदीच्या किंमती जाहीर केल्या आहेत. सोन्याच्या दरात आज थोडीफार वाढ दिसून आली. सोमवारी आणि मंगळवारी सोन्याचे भाव वाढले होते. सरकारने सोन्यावर आयत शुल्क (Import Duty) वाढवले आहे. त्याचा परिणाम दिसून आला होता. सोन्याचे भाव लवकरच आणखी वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत असतानाच सोन्याचे दर एक हजार रुपयांच्या टप्प्यात कमी जास्त होत आहेत. आज सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदीत (Gold Silver Price) घसरणीचे सत्र पहायला मिळाले. शुद्ध सोन्याचे भाव आज 51 हजारांच्या आत तर शुद्ध चांदीची किंमत आज 56 हजार रुपये प्रति किलो होती. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ibjarates.com वर आजचे सोन्या-चांदीचे भाव दिले आहेत. त्यानुसार,8 जुलै रोजी 999 शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा भाव 52 हजार रुपयांवरुन घसरुन 50,877 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गेल्या अनेक दिवसांपासून सोने 50 हजारांच्या तर चांदी 60 हजार रुपयांच्या घरात विक्री होत होती.

ibjarates.com नुसार, 999 शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्याचा दर आज प्रति 10 ग्रॅम 5०,877 रुपये दर आहे. तर 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर शुक्रवारी 50,673 रुपये होता. 916 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर आज 46,603 रुपये आहे. 750 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर बुधवारी 38158 रुपये आहे. तर 999 शुद्ध असलेल्या चांदीचा भावात प्रचंड घसरण झाली आहे. गेल्यावेळी एक किलो चांदीचा भाव 65,825 रुपये होता, मंगळवारी चांदीचा भाव 66,468 रुपये प्रति किलो होता तर आज बुधवारी चांदी 56081 प्रति किलो दराने मिळत होती.शुक्रवारी चांदीचा दर 56,626 रुपये किलो होता.

अशी तपासा सोन्याची शुद्धता

सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

हे सुद्धा वाचा

शुद्ध सोन्याची ओळख अशी करा

सोन्याच्या दागिन्याची शुद्धता ओळखण्याची एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमार्कशी संबंधित अनेक चिन्हे दिसून येतात. या चिन्हांमुळे सोन्याची गुणवत्ता सिद्ध होते. सोने कोणत्या कॅरेटचे आहे ते दिसून येते. सोन्यामध्ये एक कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंतची तफावत असते. सोन्याचे दागिने तयार करण्यसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. ज्वेलरी वर हॉलमार्क लावणे, चिन्हांकित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....